नाशिक, 3 सप्टेंबर (आ.प्र.) :
घाट मार्गातील जमिनीची धूप राेखून रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने व्हेटिव्हर बायाेइंजिनिअरिंगचा अवलंब केला आहे. दक्षिण- पूर्व घाट विभागात 5300 चाैरस मीटर क्षेत्रात व्हेटिव्हर गवताची प्रायाेगिक लागवड करण्यात आली आहे.
उतारांची स्थिरता वाढवण्यासाठी पारंपरिक अभियांत्रिकी उपायांसाेबत या निसर्गाधारित उपायाची परिणामकारकता तपासण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या बाेर घाटातील कर्जत-लाेणावळा आणि थाळ घाटातील कसारा-इगतपुरी या मार्गांवर पावसाळ्यात मातीची धूप, पाण्याचा वेगवान प्रवाह, दगड काेसळणे आणि भूस्खलनाचा धाेका असताे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता धाेक्यात येते. या पार्श्वभूमीवर उतारांचे नैसर्गिक पद्धतीने स्थिरीकरण करण्यासाठी व्हेटिव्हर गवताचा वापर करण्याच्या शक्यता मध्य रेल्वेकडून पडताळल्या जात आहेत. जागतिक स्तरावर व्हेटिव्हर सिस्टीमम अंतर्गत जैवअभियांत्रिकी वनस्पती म्हणून व्हेटिव्हर गवताचा वापर केला जाताे. त्याची मुळे जमिनीत खाेलवर जाऊन तंतुमय जाळे तयार करतात. त्यामुळे माती बांधून ठेवण्यास मदत हाेते.
हे गवत पृष्ठभागावरील पाण्याचा वेग कमी करते, वाहून येणारा गाळ अडवते आणि उतारावरील धूप राेखण्यास मदत करते. 12 ते 24 महिन्यांत हे गवत तीन ते चार मीटरपर्यंत वाढू शकते. त्याच्या मुळांमुळे मातीचा कातरण प्रतिराेध सुमारे 30 ते 40 ट्न्नयांनी वाढण्यास मदत हाेत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. दक्षिण-पूर्व घाट विभागात भरावाच्या संरक्षणासाठी व्हेटिव्हरची प्रायाेगिक लागवड करण्यात आली आहे.
खंडाळा- मंकी हिल विभागात अप मार्गालगत 1050 चाैरस मीटर क्षेत्रात, तर ठाकूरवाडी केबिन-पळसदरी विभागात मिड- लाइनलगत 4250 चाैरस मीटर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. घाट मार्गातील उतार आणि भरावांवर समाेच्च रेषांमध्ये व्हेटिव्हरची कुंपणे लावण्यात येत आहेत. व्हेटिव्हरच्या या नैसर्गिक उपायामुळे घाट विभागातील मातीची धूप आणि उतारांची अस्थिरता कमी हाेण्याची अपेक्षा आहे. परिणामी, रुळांवर दरडी किंवा राडाराेडा काेसळण्याच्या घटना कमी करण्यास मदत हाेऊ शकते. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याबराेबरच पारंपरिक संरक्षणात्मक उपाययाेजनांच्या देखभालीवरील खर्च कमी करण्यासही या उपायाचा उपयाेग हाेईल, असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.