मुंबई, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
महावितरणच्या वीजयंत्रणेतील नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, वीजबिल वसुली किंवा मीटर काढणे यासारखी कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून करण्याची पूर्णतः जबाबदारी तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहेत. अशी तांत्रिक व जाेखमीची कामे करवून घेण्यासाठी काेणत्याही प्रकारे खासगी व्य्नती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करू नये.
असे प्रकार आढळल्यास व विद्युत अपघात झाल्यास संबंधित दाेषी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीसारखी कठाेर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले. याबाबत संचालक धनंजय औंढेकर यांनी नुकतेच परिपत्रक काढून क्षेत्रीय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंत्यांना याबाबतचे आदेश दिले.
वीजयंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे हे प्रत्येक संबंधित अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे.
वीजयंत्रणेत प्रत्यक्ष कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तंत्रज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांवर नादुरुस्त वितरण राेहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीतील बिघाड शाेधणे, वीज पुरवठ्याच्या ग्राहक तक्रारी साेडवणे, वीजबिलांची वसुली करणे आणि थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणण्यासारख्या कामांची जबाबदारी साेपवण्यात आली आहे.
महावितरणचे काही कर्मचारी ही कामे स्वतः करण्याऐवजी खासगी व्य्नतींकडून करून घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कामांसाठी खासगी व अनधिकृत व्य्नतींचा वापर करणे गंभीर बाब आहे. त्यामुळे विद्युत अपघात घडून संबंधित खासगी व्य्नतींना अपघात हाेण्याची माेठी शक्यता आहे. याशिवाय वीज ग्राहक व महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान हाेते.
महावितरणने अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या खासगी व्य्नतीस वीजयंत्रणेवर काेणत्याही प्रकारचे काम करण्यास परवानगी देणे अथवा त्याच्याकडून काम करून घेणे बेकायदा तसेच महावितरणच्या सेवाविनियमांनुसार ही बाब गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीत माेडते. या बाबींची दखल घेत औंढेकर यांनी परिपत्रकाद्वारे कठाेर निर्देश दिले आहेत.