ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य

एसटीचा निर्णय : १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डद्वारेच

    29-Sep-2026
Total Views |

ST 
मुंबई, 28 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत याेजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी 1 ऑक्टाेबरपासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना एनसीएमसी कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटीने घेतला असून, त्यासाठी कार्ड नाेंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगारे आणि बस स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे.
 
एसटीकडून विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यात अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापनासाठी एनसीएमसी कार्डचा वापर करण्यात येत आहे. 1 ऑक्टाेबरपासून सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डमधूनच वितरित केले जाईल.
 
त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी त्यापूर्वी एनसीएमसी कार्डची नाेंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत एनसीएमसी कार्ड आहे किंवा कार्ड नाेंदणी केल्याची क्यूआर काेड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळेल.
 
विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक; तसेच महिला प्रवाशांना नाेंदणी केल्यानंतर मिळालेली पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येईल. ही नाेंदणी पावती 30 दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड सक्रिय करून त्यात रिचार्ज करणे आवश्यक आहे.
 
एनसीएमसी कार्ड नाेंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नाॅलाॅजीज लिमिटेडची एसटी बस स्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियु्नती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर कार्ड नाेंदणीची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. एनसीएमसी कार्डमध्ये र्नकम भरण्यासाठी भीम अ‍ॅपद्वारे रिचार्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला क्यूआर काेड भीम अ‍ॅपच्या माध्यमातून स्कॅन करून रिचार्ज करता येणार आहे. आधार कार्डवरील बायाेमेट्रिकमध्ये बाेटांचे ठसे न उमटल्यामुळे नाेंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
आधार कार्डशी संलग्न माेबाइल क्रमांकावर प्राप्त हाेणाऱ्या ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्ड नाेंदणीची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.