वाशिम जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

    24-Sep-2026
Total Views |
 
CMFadanvis
मुंबई, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
वाशिम जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आता दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध हाेणार असून, जिल्ह्याला माेतीबिंदूमु्नत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने माेठे पाऊल उचलले आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाशिम जिल्हा प्रशासन आणि जे. एम.
 
फायनान्शिअल फाऊंडेशन दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर जिल्हाधिकारी याेगेश कुंभेजकर आणि जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या वतीने कार्यकारी संचालक पूजा दवे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे विशेष काैतुक केले.
 
या करारामुळे भविष्यात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून कामासाठी संपूर्ण राज्याला उत्तम माॅडेल मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला. आम्हाला शासनासाेबत खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. वाशिममधील एकही गरजू व्य्नती दर्जे दार नेत्रसेवेपासून वंचित राहू नये, हे आमचे उद्दिष्ट आहे, असे जे. एम. फायनान्शियल फाऊंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील नेत्रसेवेची सध्याची स्थिती, उपाययाेजना आणि या भागीदारीतून हाेणाऱ्या अपेक्षित परिणामांविषयी माहिती दिली.