पुणे, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
दिव्यांग सैनिक आणि रुग्णांनी दगडूशेठच्या बाप्पाच्या आरतीचा व्हीआर तंत्रज्ञानाद्वारे अनुभव घेतला. खडकीच्या पीआरसीमधील सुमारे 45 सैनिकांनी आणि सूर्य सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांनी व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून गणेश आरती केली. खडकीच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये (पीआरसी) उपचार घेत असलेल्या सुमारे 45 सैनिकांना; तसेच सूर्य सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभव घेता आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने पुणेस्थित तंत्रज्ञान कंपनी क्यूबिटने हा उपक्रम राबवला. यावेळी सेंटरचे वैद्यकीय संचालक कर्नल डाॅ. आर. के. मुखर्जी व क्यूबिटच्या शाल्वी पारगे उपस्थित हाेत्या. सैनिक आणि रुग्णांना व्हीआर हेडसेटच्या माध्यमातून 360 अंशांच्या स्वरूपात आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या अनुभवात सहभागी झालेल्या सैनिकांनी आनंद व्य्नत केला. सैनिकांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक हाेता.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भावनिक आणि आध्यात्मिक नाते निर्माण करून आरतीचा अनुभव अधिकाधिक लाेकांपर्यंत पाेहाेचवता येणे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे, असे शाल्वी पारगे यांनी सांगितले.