सकाळची धावपळ, उशिरा रात्रीपर्यंत माेबाईल स्क्रीनला चिकटून राहणे, कामाचा सततचा ताण, जंक फूडचे वाढते व्यसन, सतत घटणारी झाेप आणि शारीरिक हालचालींमधील घट हे सर्व घटक आहेत ज्यांमुळे गेल्या दशकात भारतीयांसाठी हाय ब्लड प्रेशर ही एक गंभीर समस्या बनली आहे. ही काेणतीही लहान समस्या नसून आराेग्यासाठी एक गंभीर धाेका आहे. दरवर्षी 10 लाखांपेक्षा जास्त भारतीय, ज्यांचे वय सामान्यतः 30 ते 40 वर्षांदरम्यान आहे, त्यांच्यासाठी हाय ब्लड प्रेशर सायलेंट किलर बनून समाेर आले आहे. (भाग 1)
सायलेंट किलर यासाठी कारण भलेही शरीरात त्याचा पाया हळूहळू रचला जात असला, तरी दीर्घकाळापर्यंत त्याबद्दल काहीच कळत नाही. सामान्यतः त्याबद्दल तेव्हाच कळते, जेव्हा त्याने शरीराला प्रचंड प्रमाणात आपल्या कचाट्यात घेतलेले असते. एके काळी याला वयाेवृद्ध म्हणजेच म्हाताऱ्या लाेकांचा आजार मानले जात हाेते, परंतु आज ही 30 पासून ते 50 वर्षांपर्यंतच्या लाेकांसाठी एक माेठी गंभीर आराेग्य समस्या आहेत. यामुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्राेक आणि किडनी फेल हाेणे यांसारख्या समस्या माेठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कदाचित हेच कारण हाेते, ज्यामुळे जागतिक आराेग्य संघटनेने वर्ष 2005 मध्ये पहिल्यांदा जगाला हाय ब्लड प्रेशरबद्दल इशारा देण्यासाठी किंवा त्याची भयानकता समजावण्यासाठी 17 मे हा दिवस वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणून साजरा करण्याच्या कल्पनेला औपचारिक मंजुरी दिली हाेती, ज्याचा प्रस्ताव वर्ल्ड हायपर टेन्शन लीग द्वारे करण्यात आला हाेता.
भारतात वाढती समस्या
तसे तर हाय ब्लड प्रेशरची समस्या संपूर्ण जगातील गंभीर आराेग्य समस्यांपैकी एक आहे, परंतु गेल्या एका दशकात ही समस्या जितक्या वेगाने भारतात वाढली आहे तितक्या वेगाने दुसऱ्या काेणत्याही देशात वाढलेली नाही. म्हणूनच भारतात वर्ल्ड हाय ब्लड प्रेशर डे किंवा वर्ल्ड हायपर टेन्शन डे ला अतिशय गंभीरतेने घेतले जाते. या दिवसाचा उपयाेग लाेकांना या सायलेंट किलर मानल्या जाणाऱ्या आराेग्य समस्येबद्दल जागरूक करण्यासाठी केला जाताे आणि दरवर्षी या समस्येचा सामना करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीवर भर दिला जाताे. ज्याचा मुख्य उद्देश हा आहे की लाेकांनी वेळेवर आपल्या बीपीवर लक्ष ठेवावे आणि त्याच्या नियमित तपासणी प्रति जागरूक राहावे. वास्तवात, भारतात दरवर्षी जितके लाेक बीपीमुळे माेठ्या आणि भयानक समस्यांमधून जातात, त्यांपैकी बहुतांश लाेकांना त्यापूर्वी बीपीबद्दल काेणतीही खास माहिती नसते किंवा माहिती असते पण ते त्याप्रति उदासीन असतात. देशात दरवर्षी लाखाे लाेक जे स्ट्राेक आणि अर्धांगवायूचे (लकव्याचे) बळी ठरतात, त्यांपैकी जवळपास निम्मे किंवा त्याहून अधिक केसेस बीपीला गंभीरतेने न घेतल्यामुळे किंवा त्याप्रति निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हाेतात. म्हणूनच, हा दिवस जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयांसाठी अधिक महत्त्वाचा आणि इशारा देणारा (चेतावणीरूप) आहे.