मुंबई, 16 सप्टेंबर (आ.प्र.) :
प्रयाेगशाळेत विकसित हाेणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्राेन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शाेरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी देशात उभारावी.
या उदयाेन्मुख क्षेत्रात भारतीय उद्याेगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.
भारतातील रत्न व आभूषण उद्याेगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय कामगिरीचा गाैरव करणारा 52वा इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवाॅर्ड्स साेहळा येथे झाला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गाेविंद ढाेलकिया, काैन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साळी आदी यावेळी उपस्थित हाेते.
वर्ष 2025 मध्ये देशाची रत्न व आभूषण निर्यात 2 लाख 44 हजार काेटींवर गेली आहे. देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीत या क्षेत्राचा वाटा 6.3 ट्नके आहे. या उद्याेगातून सुमारे 75 लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष राेजगार मिळत आहे. भारत जगातील 90 ट्न्नयांहून अधिक कटिंग आणि पाॅलिशिंग केलेल्या हिऱ्यांवर प्रक्रिया करताे. हे भारतीय उद्याेजकांच्या साहसाचे आणि काैशल्याचे उदाहरण आहे. युराेपिय महासंघ, संयु्नत अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि ब्रिटनसाेबत झालेल्या मु्नत व्यापार करारांचा उपयाेग करून या उद्याेगाने नव्या बाजारपेठा आणि व्यावसायिक संधी शाेधाव्यात, असे शहा यांनी सांगितले.
देशाच्या निर्यातीत तसेच आर्थिक विकासात रत्न व आभूषण उद्याेगाचे याेगदान महत्त्वपूर्ण आहे. या उद्याेगाला पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुलभ दळणवळणाची जाेड देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे 50 हजार राेजगार निर्माण हाेतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला. भारत डायमंड बाेर्स परिसरात आगामी काळात बांधकाम, उद्याेग आणि राेजगार वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांनीही मनाेगत व्य्नत केले. रत्न आभूषण उद्याेगातील कंपन्या व व्यापाऱ्यांना यावेळी शहा यांच्या हस्ते गाैरवण्यात आले.