पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिठी नदीचे पुनरुज्जीवन

वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करून हरित पट्टा विकसित केला जाणार

    06-Aug-2026
Total Views |

mithiriver 
‘मुंबई, 5 ऑगस्ट (आ.प्र.) :
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिठी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) घेतला आहे. यासाठी मिठी नदीलगत 3.3 किमीचा प्राेमेनाड (नदीकिनारा मार्ग) विकसित केला जाईल. या किनारा मार्गात उद्यान, सायकल मार्गिकेसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तेथे माेठ्या संख्येने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करून हरित पट्टा विकसित केला जाईल.
 
माटुंगा कल्व्हर्टपासून मिठी नदीच्या मुखापर्यंतच्या विस्तारित मार्गावर हा नदीकिनारा मार्ग विकसित केला जाईल. या मार्गावर उपाहारगृह, निरीक्षण मंच, फेरफटका मारण्यासाठी विशेष मार्ग, सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा अशा सुविधांचा यात समावेश असेल. नदी किनाऱ्यालगत स्थानिक प्रजातींची झाडे, प्रदूषण शाेषून घेणाऱ्या वनस्पतीही लावण्यात येतील. नदीकिनारा मार्ग प्रकल्पातील इतर हरित क्षेत्रांशी जाेडण्यासाठी पादचारी पूल व सायकल मार्गिका या पर्यायांचा समावेश असेल.
 
धारावीत 40 हजार झाडांचे संवर्धन व लागवड करण्यात येईल. दाेन लाखांपैकी 30 हजार झाडांची लागवड झाली असून, येत्या काही महिन्यांत 75 हजार झाडे लावली जातील. उर्वरित झाडांची लागवड टप्प्याटप्प्याने केली जाईल. वृक्षलागवड व देखभालीसाठी पर्यावरणविषयक सल्लागार संस्थेची नियु्नती करण्यात आली आहे. ही संस्था वैज्ञानिक पद्धतीने वृक्षलागवड, सिंचन, संरक्षण व देखभालीवर देखरेख ठेवणार आहे.
 
प्रत्येक सहा महिन्यांनी वृक्षलागवड, देखभालीसंबंधीचा अहवाल या संस्थेकडून सादर केला जाईल.