शालेय अभ्यासक्रमात नशामुक्ती पाठ्यक्रमाचा समावेश करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    06-Aug-2026
Total Views |
 
drugfreeschool
मुंबई, 5 ऑगस्ट (आ.प्र.) :
‘शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधेचा समताेल साधत राज्य शासन विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी शालेय अभ्यासक्रमात नशामु्नतीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला.
 
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डाॅ. पंकज भाेयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयु्नत सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्र, प्रधान सचिव श्रीकर परदेशी व शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित हाेते.
 
शाळांमध्ये नशाविराेधी मार्गदर्शक व समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा आणि ड्रग-फ्री स्कूल अभियान राबवण्याचा माेठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 
शाळांमधील सुरक्षा, सायबर फसवणूक आणि अमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी व कठाेर उपाययाेजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी भुसे यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली. डाॅ. भाेयर यांनी शाळांमध्ये नशामु्नती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे भुसे यांनी सांगितले