नाशिक, 2 ऑगस्ट (आ.प्र.) :
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रस्ते, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन, फायबर केबल, ड्रेनेज; तसेच विविध युटिलिटीची कामे माेठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
ही कामे विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असले तरी त्यादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेत काेणतीही तडजाेड हाेणार नाही, याची संबंधित विभागांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
महापालिका सभागृहात झालेल्या बैठकीत महाजन बाेलत हाेते. यावेळी महापाैर हिमगाैरी आडके-आहेर, आमदार प्रा.
देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, स्थायी समितीचे सदस्य मच्छिंद्र सानप, महापालिका आयु्नत मनीषा खत्री, अतिर्नित आयु्नत अमित रंजन, स्मिता झगडे, उपायु्नत लक्ष्मीकांत साताळकर, पाेलीस उपायु्नत किशाेर काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.
नाशिक शहरात विविध विभागांची विकासकामे एकाचवेळी सुरू असल्याने काही प्रमाणात वाहतूक काेंडी व नागरिकांची गैरसाेय हाेणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या असून, त्या गंभीर आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकाेर पालन करणे आवश्यक आहे. काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पुढील वर्षभरात माेठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार असल्याने ही कामे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी नियाेजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे महाजन यांनी सांगितले.
काम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, याेग्य दिशादर्शक फलक लावणे, पुरेशा प्रमाणात बॅरिकेड्स उभारणे, रात्री परावर्तित (रिफ्लेक्टर) सूचना फलक लावणे; तसेच वाहतुकीचे याेग्य नियाेजन करणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययाेजनांत काेणतीही त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले. सुरक्षेसंदर्भात तक्रारी असलेल्या भागात संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करावी.
ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील त्या तातडीने दूर करण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.