ठाणे, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या क्रीडा, आराेग्य आणि परस्पर संवादाला नवी दिशा देणाऱ्या ठाण्यातील 100 वर्षे जुन्या ऐतिहासिक ऑफिसर्स क्लबचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून, याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शतकाचा गाैरवशाली वारसा लाभलेल्या या वास्तूला आधुनिक रूप मिळाल्यामुळे अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्त दिनक्रमातून अधिकाऱ्यांना विरंगुळा मिळावा, त्यांचे आराेग्य सुदृढ राहावे आणि आपसातील साैहार्द वाढीस लागावे, या उद्देशाने या वास्तूचा कायापालट करण्यात आला आहे. या क्लबमध्ये अत्याधुनिक बॅडमिंटन काेर्ट, टेबल टेनिस, बिलियर्ड्स टेबल, सुसज्ज व्यायामशाळा आणि उत्कृष्ट कॅफेटेरिया अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक क्लबचा अधिकाऱ्यांनी सक्रिय वापर करून या परिसराला आराेग्य आणि संवादाचे चैतन्यमय केंद्र बनवावे, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा ऑफिसर्स क्लबचे अध्यक्ष डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. या नव्या सुविधांमुळे सर्व अधिकाऱ्यांना उत्तम आराेग्य आणि एकत्र येण्यासाठी एक ह्नकाचे व्यासपीठ मिळाले आहे.