सासवड, 1 ऑगस्ट (आ.प्र.) :
‘मी आठवी-नवीत शिकत असताना आमच्या शेतात जाण्याचा रस्ता बस स्थानकावरून जात असे. तेथून लाल दिव्याची एक गाडी जाताना दिसायची. ती कलेक्टरची गाडी असल्याचे बाबांनी सांगितले आणि त्याचक्षणी मी कलेक्टर हाेण्याचे स्वप्न पाहिले. मी जिद्द साेडली नाही.
त्याच चिकाटीमुळे आज मला जिल्हा सत्र न्यायाधीश पदावर सेवेची संधी मिळाली. माेठी स्वप्ने पाहा, न्यायाधीश व्हा आणि समाजासाठी जगा,’ अशा शब्दांत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. अरविंद वानखेडे यांनी बालगृहातील विद्यार्थिनींसमाेर आपल्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडला.
पद्मश्री डाॅ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदनात (बालगृह) आयाेजित गुणवंत विद्यार्थी सत्कार साेहळ्यात न्या. वानखेडे बाेलत हाेते. शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गाैरव करण्यात आला. सिंधुताईंचे मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड, सासवडचे दिवाणी न्यायाधीश टी. पी. माेटे, द्वितीय सहन्यायाधीश आर. ए. सावंत, सहन्यायाधीश एस. जी. सावंत, ममताताई सपकाळ, विनय सपकाळ, सार्थक सेवा संघाचे (आंबळे) अनिल कुडिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.
अनाथ, निराधार व निराश्रित मुलांकडे आधार कार्ड, जन्मदाखला, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रचर्वीं गायकवाड यांनी उपस्थित केला. न्या.
वानखेडे यांनी याच तातडीने दखल घेत, संबंधित यंत्रणांची बैठक बाेलावून पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आवश्यक उपाययाेजना राबवण्यात येतील, अशी ग्वाही दिली. या आचवलासनामुळे अनाथ मुलांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर हाेण्याची आशा व्य्नत करण्यात आली.