अक्कलकोट मंदिर परिसराचा विकास म्हाडामार्फत होणार

    02-Aug-2026
Total Views |

swami 
मुंबई, 1 ऑगस्ट (आ.प्र.) :
अ्नकलकाेट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या नियाेजनबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) विशेष नियाेजन प्राधिकरण म्हणून नियु्नती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
 
अ्नकलकाेटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली हाेती त्यानुसार अक्कलकाेट नगर परिषद, साेलापूरचे जिल्हाधिकारी आणि म्हाडाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला हाेता. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, अ्नकलकाेट मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व विकास, वाहनतळ उभारणी, आरक्षित जागांचा विकास; तसेच परिसराचे सुयाेग्य नियाेजन करण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी म्हाडाने सुमारे 500 काेटींची तरतूद करण्याची तयारी दर्शवली आहे.