प्रत्येक रक्त पिशवीची सुरक्षा चाचणी अनिवार्य

अन्न व औषध प्रशासनाची नियमावली प्रत्येक टप्प्यासाठी एसओपी निश्चित

    13-Aug-2026
Total Views |
 
bag
मुंबई, 12 ऑगस्ट (आ.प्र.) :
राज्यातील र्नतपेढ्यांत र्नतसुरक्षा, गुणवत्ता आणि नियामक अनुपालन अधिक प्रभावी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व र्नत केंद्रे आणि र्नत साठवणूक केंद्रांसाठी सर्वसमावेशक अनुपालन आदेश जारी करण्यात आला असून, र्नत संकलनापासून ते वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक र्नतपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, सी, सिफिलिस आणि मलेरिया यासाठी तपासणी करणे अनिवार्य असेल.
 
र्नत व र्नतघटकांची याेग्य तापमानात साठवण, काेल्ड चेन कायम राखणे आणि संशयित र्नतपिशव्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाइन व्यवस्था ठेवणेही स्नतीचे केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या र्नत केंद्रांवर कठाेर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
 
औषधे व साैंदर्यप्रसाधने कायदा-1940 अंतर्गत मानवी र्नत आणि त्याचे घटक हे औषध म्हणून अधिसूचित आहेत. त्यामुळे वैध परवान्याशिवाय काेणत्याही संस्थेला र्नत संकलन, प्रक्रिया, साठवण किंवा वितरण करता येणार नाही. काही र्नत केंद्रांच्या तपासण्यांमध्ये अनुसूचीएफमधील अटींचे पालन हाेत नसल्याचे निदर्शनास आले हाेते.
 
र्नत केंद्रांत आवश्यक पायाभूत सुविधा, समुपदेशन कक्ष, गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि र्नतघटक प्रक्रिया सुविधा उपलब्ध ठेवणे बंधनकारक असेल. पात्र वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, र्नतपेढी तंत्रज्ञ, परिचारिका आणि समुपदेशकांची नियु्नती करावी लागेल. र्नतदान शिबिरांचे आयाेजन करताना आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे, आपत्कालीन सुविधा, र्नताची सुरक्षित वाहतूक आणि शिबिरानंतरची अहवाल प्रणाली निश्चित करावी लागेल. प्रत्येक र्नत केंद्राने ई-र्नतकाेश पाेर्टलवर र्नतसाठा आणि संबंधित माहिती राेज अद्ययावत ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील सर्व र्नत केंद्रांना त्यांच्या विद्यमान कार्यपद्धतींचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश एफडीएने दिले आहेत.
आदेशाचे पालन न करणाऱ्या र्नत केंद्रांविरुद्ध नियमानुसार कठाेर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.