संध्यानंद.काॅम (पान 14 पाहा)
सातत्याने नेटवर्कमध्ये अडथळा आल्याने तणाव आणि असुरक्षिततेची भावना वाढली. आवश्यक काॅल कट झाल्याने अस्वस्थता, असहाय्यता जाणवते...
देशात हायवेवर माेबाइल नेटवर्कची समस्या कायम आहे. सीएमआरच्या रिपाेर्टनुसार, हायवेवर प्रवास करणाऱ्या 79% स्मार्टफाेन यूजर्सना काॅल ड्राॅप किंवा नेटवर्कमध्ये अडथळ्याचा सामना करावा लागताे.
कामकाजावर परिणाम
64% बिझनेस यूजर्सनी सांगितले की, काॅल ड्राॅपमुळे ्नलायंट डील हाेऊ शकले नाही.
प्रत्येक 3 पैकी 2 यूजर्स म्हणाले, ‘खराब सिग्नलमुळे ्नलायंट गमवावे लागले.
71% लाेकांना ग्राहकांना पुन्हा फाेन करावे लागले. त्यामुळे व्यावसायिक प्रतिमा खराब झाली.
मानसिक दबावसुद्धा वाढला
83% लाेकांनी सांगितले की, आवश्यक काॅल कट झाल्याने अस्वस्थता, असहाय्यता जाणवते.
सातत्याने नेटवर्कमध्ये अडथळा आल्याने तणाव आणि असुरक्षिततेची भावना वाढली.
मेट्राे आणि इनडाेअर लाे-सिग्नल झाेनमध्ये स्थिर कने्निटव्हिटी आव्हान आहे.
फाेन डिझाइनचा परिणाम?
ट्रिपल-सिग्नल चिपसेट असलेले फाेन ज्यांच्याकडे आहेत अशा 81% लाेकांनी अधिक चांगले नेटवर्क असल्याचा अनुभव सांगितला.
अशा 74% यूजर्सना हायवे प्रवासा दरम्यान काॅलिंग जास्त विश्वासार्ह वाटले.