भंगार विक्रीतून मध्य रेल्वेची २०० कोटी रुपयांची कमाई

विभागनिहाय कामगिरीत मुंबई अव्वल, तर भुसावळ विभाग दुसऱ्या स्थानी

    13-Aug-2026
Total Views |
 
waste
भुसावळ, 12 ऑगस्ट (आ.प्र.) :
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भंगार विक्रीच्या माध्यमातून 200 काेटींचा टप्पा गाठत आतापर्यंतची सर्वांत जलद कामगिरी नाेंदवली. या कामगिरीत भुसावळ विभागाने 33 काेटींपेक्षा अधिक भंगार विक्री करून महत्त्वपूर्ण याेगदान दिले.
विभागनिहाय कामगिरीत भुसावळ विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून, एकूण भंगार विक्रीत त्याचा माेठा वाटा आहे.
 
मध्य रेल्वेकडून विविध प्रकारचे टाकाऊ साहित्य नियाेजनबद्ध पद्धतीने वर्गीकृत करून त्याची लिलावाद्वारे विक्री करण्यात येत आहे. यात रेल्वे रूळ भंगार, स्लीपर्स, लाेहयु्नत व अ-लाेहयु्नत भंगार; तसेच जुन्या राेलिंग स्टाॅकचा समावेश आहे. या प्रक्रियेमुळे रेल्वेच्या आवारातील अनावश्यक साहित्य कमी हाेण्यासह त्यातून माेठ्या प्रमाणात महसूलही प्राप्त हाेत आहे.
 
मध्य रेल्वेच्या एकूण 202.55 काेटींच्या भंगार विक्रीत भुसावळ विभागाने 33.19 काेटींचा महसूल मिळवला.
मुंबई विभागाने 36.78 काेटींची विक्री केली असून, त्यानंतर भुसावळ विभागाची कामगिरी राहिली आहे. पुणे विभाग 27.22 काेटी, नागपूर विभाग 26.12 काेटी आणि साेलापूर विभाग 10.85 काेटींच्या विक्रीसह पुढे आहेत.
 
उत्पादन युनिट्स व कार्यशाळांनी मिळून 68.39 काेटींचे याेगदान दिले. भुसावळ विभागातील विविध ठिकाणी साठलेले भंगार शाेधणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि वेळेत त्याची विल्हेवाट लावण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या या माेहिमेत माेठ्या प्रमाणावर साहित्य विक्री करण्यात आली.
 
आतापर्यंत 17755 टन रेल्वे रूळ भंगार, 1,21,381 स्लीपर्स, 11658 टन लाेहयु्नत भंगार विक्री करण्यात आले.
याशिवाय 11 लाेकाेमाेटिव्ह, 33 डबे आणि 33 वॅगन्सचीही विक्री करण्यात आली.
भंगाराची वेळेत विल्हेवाट लावल्यामुळे रेल्वेच्या विविध परिसरातील जागा माेकळी हाेऊन तिचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करता येणार आहे.