चांदाेली, 26 जुलै (आ.प्र.) : चांदाेली धरण परिसरात पुन्हा एकदा वाघिणीच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाच्या भिंतीलगत असलेल्या रिंगराेडवर नुकतेच तारा वाघिणीचे दर्शन झाले. पर्यटक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांची माेठी वर्दळ असलेल्या या मार्गावर वाघीण मु्नतपणे फिरत असल्याची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली. या परिसरात वन विभागाने तातडीने गस्तीसाठी पथक नियु्नत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाघीण काही काळ रिंगराेड परिसरात वावरत हाेती.
धरणाला लागून असलेला हा मार्ग नेहमीच नागरिकांच्या वर्दळीचा असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी वन विभागाशी संपर्क साधला. चांदाेली परिसरात वाघांचा वावर नवीन नसला तरी धरणाच्या भिंतीलगत आणि सार्वजनिक रस्त्यावर वाघिणीचे दर्शन हाेणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळीच आवश्यक उपाययाेजना न केल्यास एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्य्नत केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळावी.
चांदाेली परिसरात तातडीने विशेष गस्त पथके तैनात करावीत, पर्यटक आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.