महाराष्ट्रातील 21 हजारांहून अधिक कारखाने प्रदूषणाच्या रेड झाेनमध्ये

    08-Jun-2026
Total Views |
 
 
 
 

red zone 
 
देशातील प्रमुख औद्याेगिक राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रालाही औद्याेगिक प्रदूषणाचा तसाच धाेका आहे. राज्यातील कारखान्यांची सर्वाधिक प्रदूषण क्षमतेनुसार रेड, ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट झाेनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी रेड झाेनमध्ये येणाऱ्या कारखान्यांची संख्या सुमारे 21,540 आहे. तथापि, नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एवढ्या माेठ्या संख्येने असलेल्या कारखान्यांना नियमित भेटी देण्यासाठी, कारखान्यांमधून साेडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यावर किंवा वायूंवर सतत देखरेख ठेवण्यासाठी किंवा प्रदूषणसंबंधित नियमांच्या उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही.महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणात यापूर्वी डिसेंबर 2025 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली हाेती. त्यानुसार, मुंबई विभागात लाल श्रेणीत असलेल्या उद्याेगांची संख्या 1,560 आहे. यापैकी 704 माेठे उद्याेग, तर 790 मध्यम आकाराचे उद्याेग आहेत. कल्याणमध्ये 2,685 उद्याेग लाल श्रेणीत आहेत. यापैकी 255 माेठे उद्याेग,तर 2,340 छाेटे उद्याेग आहेत. हे नमूद करण्यासारखे आहे की, येथे डाेंबिवली व्यतिरिक्त, अंबरनाथ आणि बदलापूरसह औद्याेगिक वसाहतींमध्ये प्रदूषणाच्या तक्रारी वारंवार प्राप्त हाेतात. तथापि, प्रदूषणाची क्षमता असलेले सर्वाधिक उद्याेग पुणे विभागात आहेत.लाल श्रेणीत 5,572 उद्याेग आहेत, त्यापैकी 2,309 माेठे उद्याेग तर 2,949 छाेटे उद्याेग आहेत.