नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात अनावरण करण्यात आले. वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकाेचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गाेयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक व अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. या स्मारकात 8 फुटांच्या भव्य चबूतऱ्यावर 12 फुटांचा कांस्यचा अर्धपुतळा (बस्ट) बसवण्यात आला आहे. नवी मुंबईतील ‘आकार आर्ट अँड स्कल्पचर’चे शिल्पकार नितीन गाेर्डे यांनी हा पुतळा साकारला आहे. विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांसाठी आणि अभ्यागतांसाठी हे स्थान सांस्कृतिक महत्त्वाचे मुख्य केंद्र बनेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.