राज्यात यंदा विजेची उच्चांक मागणी नाेंदवण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियाेजन, मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषी पंपांचे विक्रमी साैर ऊर्जाकरण, नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती व वापर यामुळे विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले.आगामी काळात विजेची वाढती मागणी, तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना अखंडित व स्वस्त दरांत वीजुरवठ्यास महावितरण सक्षम आहे, अशी ग्वाही महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र यांनी दिली.कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग हाेणार असल्याने महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनीच मिशन माेडवर काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन प्रकाशगडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. म. रा. वीज मंडल सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, तसेच महावितरणचे संचालक (संचालन तथा प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, संचालक (वाणिज्य)याेगेश गडकरी, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित हाेते.महावितरणने पारदर्शक, स्पर्धात्मक बाेली प्रक्रियेने सर्व ऊर्जा स्राेतांमध्ये आतापर्यंत 72918 मेगावाॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. वीज खरेदीत 10 हजार काेटींच्या वार्षिक बचतीसाेबतच क्राॅस सबसिडीत 13500 काेटींनी वार्षिक बाेजा कमी हाेणार आहे.
त्यामुळे प्रामुख्याने औद्याेगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त हाेतील. स्मार्ट मीटर, सब स्टेशन माॅनिटरींग सिस्टिम अशा विविध अत्याधुनिकतंत्रज्ञानाच्या वापरामुळे विजेची हानी कमी करण्यात यश येत आहे. या कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे.
मिशन माेडवर काम हाेत असल्यानेच महावितरणला जवळपास 100 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गाैरवण्यात आल्याचे लाेकेश चंद्र यांनी नमूद केले.डिसेंबर अखेरपर्यंत महावितरण शेअर बाजारात नाेंदणीकृत हाेणार असून, कर्मचाऱ्यांनाही त्यात वाटा मिळणार असल्याचे त्यांनी सांगतिले.पाठक, तालेवार, गडकरी, पवार यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी महावितरणच्या प्रगतीचा आढावा सादर केला. मुख्यमंत्र्यांचा संदेशही यावेळी दाखवण्यात आला.