‘मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, काैशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्याेजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धाेरण राज्य शासनाने स्वीकारले आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य झाल्याचे त्यांनी सांगितले.छत्रपती शाहू महाराज संशाेधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्या वतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी आयाेजित लाेकसेवा आयाेगमहाराष्ट्र लाेकसेवा आयाेग; तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान साेहळ्यात फडणवीस बाेलत हाेते.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापाैर मंजूषा नागपुरे, शिक्षण आयु्नत सचिंद्र प्रतापसिंह, नियाेजन विभागाच्या सचिव शैला ए, विभागीय आयु्नत शीतल तेली उगले, ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील उपस्थित हाेते.
फडणवीस म्हणाले, ‘सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लाेकसेवाआयाेगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षेत 140, महाराष्ट्र लाेकसेवा आयाेग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500हून अधिक तरुण-तरुणी यशस्वी झाले आहेत.विविध काैशल्य विकास प्रशिक्षणांतून 13 हजारांहून अधिक युवक राेजगारक्षम झाले.
दाेन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला. उच्च शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कात 50 ट्नके सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. माेठ्या शहरात हाेतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृह आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता याेजना सुरू करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहकार्य करण्यास सुरुवात झाली. उद्याेजकता विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गतिमान करण्यात आले आणि व्याज सवलत सुरू करण्यात आली.या माध्यमातून पाऊणे दाेन लाखांपेक्षा अधिक उद्याेजक तयार झाले असून, साडेसात हजार काेटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यासाठी शासन वर्षाला 1500 काेटी देते.’ शेती क्षेत्रातही राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार अॅप सुरू केले आहे. सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत. ड्राेन पायलट प्रशिक्षणही सारथीमार्फत सुरू करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि काेल्हापूर येथे सारथीची विभागीय केंद्रे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचे काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामे पूर्ण हाेतील, अशी माहिती त्यांनी दिली.एमपीएससी परीक्षा वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेण्यावर शासनाचा भर आहे. परीक्षांमध्ये ऑनलाइन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.