विजेच्या वापराविनाच ‘नेस्काेड तंत्रज्ञान’ घर थंड ठेवणार

    11-Jun-2026
Total Views |
 


home
 
 
 
सध्याच्या प्रचंड उन्हाळ्यात घर, ऑफीसमध्ये थंडाव्यासाठी अनेक लाेक एसी वापरतात. त्यामुळे प्रचंड वीज वापरली जाते. जगभरात एकूण विजेच्या वापरापैकी 10 टक्के वीज एसी चालवण्यासाठी वापरली जाते.पण, नुकत्याच आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे आता वीज बिलाची काळजी राहिली नाही, एसीपेक्षाही अधिक थंडावा निर्माण हाेताे. तापमान 25 डिग्रीवरून घसरून सुमारे 3 डिग्रीपर्यंत कमी हाेऊ शकते. एक युनिटही वीज न वापरणारे ‘नेस्काेड तंत्रज्ञान’ ‘नाे इलेक्ट्रिसिटी ऑर सस्टेनेबल कुलिंग ऑन डिमांड’ सारखे तंत्रज्ञान आले आहे. याला ‘नेस्काेड तंत्रज्ञान’ देखील म्हटले जाते. यामध्ये विजेचा वापर तर हाेत नाहीच, पण साेबतच पर्यावरणालाही नुकसान पाेहाेचत नाही. साैदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नाॅलाॅजीच्या संशाेधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये एक युनिटही वीज वापरली जात नाही व घर किंवा ऑफिसमध्ये थंडावा निर्माण हाेताे.
 
अमाेनियम नायट्रेटची कूलिंग सिस्टीम नेस्काेड तंत्रज्ञानात अमाेनियम नायट्रेट वापरून एक रासायनिक प्रक्रिया केली आहे. या रसायनाचा वापर खत बनवण्यासाठी केला जाताे. या रसायनाद्वारे हे तंत्रज्ञान एंडाेथर्मिक (उष्णताशाेषक) सिद्धांतावर काम करून मिठाला पाण्यात विरघळवते आणि त्याद्वारे आजूबाजूची उष्णता शाेषून घेते.या प्रयाेगा दरम्यान असे दिसून आले की, अमाेनियम नायट्रेट आणि पाण्याच्या संयाेगामुळे अवघ्या 20 मिनिटांत तापमान 25 डिग्रीवरून घसरून 3.9 डिग्रीपर्यंत खाली आले हाेते. ही प्रक्रिया इतक्या प्रभावीपणे झाली, की त्यासाठी काेणत्याही माेटर किंवा काॅम्प्रेसरची गरज भासली नाही. ती पद्धत मशीन शिवाय थंडावा निर्माण करू शकली.
 
साेलर पाॅवरच्या मदतीने रिसायकलिंग : या तंत्रज्ञानाची दुसरी माेठी सकारात्मक बाजू म्हणजे, यामध्ये साैर ऊर्जेचा वापर केला आहे. जाणकारांच्या मते, एक वेळ अमाेनियम नायट्रेट पाण्यात टाकून द्रावण तयार केले की, त्या पाठाेपाठ थंडावा निर्माण हाेताे. त्यानंतर ही सिस्टीम साेलर पाॅवरच्या मदतीने पाणी गरम करून त्याची वाफ बनवते. त्यामुळे मिठाचे क्रिस्टल्स (स्फटिक) शिल्लक राहतात.
त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून थंड करण्यासाठी वापरता येऊ शकते. अशा प्रकारे नेस्काेड तंत्रज्ञानामध्ये सतत कूलिंग प्राेसेस म्हणजे थंड करण्याची प्रक्रिया चालत राहते. यामध्ये विजेचा वापर हाेत नाही आणि साेलर पाॅवरमुळे प्रदूषणही पसरत नाही.