महान शिल्पकार मायकेल अँजेलाे म्हणाला हाेता, नेहमी माेठा विचार करा. ज्यांना मायकेल अँजेलाेबद्दल जास्त माहिती नसेल त्यांनी थाेडे गुगल करावे. त्याच्या 14 व्या शतकातील कलाकृती आजही जगाला प्रेरणा देतात. कल्पना करा की, मायकेल अँजेलाेने कलाकार बनण्याचे स्वप्न पाहिले नसते, तर जग त्याच्या अनेक महान कलाकृतींना मुकले असते. यशस्वी हाेण्याची कल्पना ही अतिशय व्यक्तीसापेक्ष असते.यशस्वी व्हायचे म्हणजे नक्की काय किंवा कशात हे आधी ज्याचे त्याने ठरवावे. आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी हाेऊ शकताे. मग ते तुमची नाेकरी, व्यवसाय, नातेसंबंध, एखादी परीक्षा अथवा एखादा स्वप्नवत जाॅब मिळवणे यापैकी काहीही असू शकते. कुणासाठी यशस्वी हाेणे म्हणजे अध्यात्मात उच्च शिखर गाठणे असू शकते, तर कुणासाठी ते आराेग्यदायी जीवनशैली जगू शकणे असू शकते.
अर्थात, बहुतांश लाेक आपली स्वप्ने बाजूला ेवून काहीतरी साेपे आणि व्यवहार्य असे काम करण्यात धन्यता मानतात. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, आपली महत्त्वाकांक्षा विसरून अल्पसंतुष्ट वृत्तीचा स्वीकार कराल, तर यशस्वी हाेणे हे केवळ स्वप्नच बनून राहील. माेठा विचार करा, त्यावर कार्य करा. अनेक संकटे येतील.परंतु, त्या विचाराशी प्रामाणिक राहा. यश हे तुमचेच असेल. जीवनात यशस्वी हाेण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने धडपड सुरू असते. मात्र अनेकदा छाेट्या-माेठ्या गाेष्टी त्रासदायक ठरतात.अशा वेळी काही गाेष्टी फाॅलाे केल्या पाहिजेत. याेग्य प्रमाणात, तसेच संतुलित आहार घ्यायला हवा.दरराेज व्यायाम करा. याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनता.लवकर झाेपा आणि लवकर उठा ही गाेष्टी सतत फाॅलाे करा. व्यसनांपासून दूर राहा. कारण त्यामुळे आयुष्य कमी, तसेच बरबाद हाेते. भाैतिक सुखापेक्षा आपले अंतर्मन कसे आनंदी राहील याचा विचार करा. चांगल्या संगतीत राहा. तसेच, नवनवीन गाेष्टी शिकत राहा. कमी बाेला आणि भरपूर ऐका ही गाेष्ट आयुष्यात सर्वांत प्रथम फाेलाे करा.