उत्तम आराेग्याचा मार्ग म्हणजे - माैखिक आराेग्याची राेज काळजी घेण

    14-May-2026
Total Views |
 

Health 
 
माैखिक आराेग्य सांभाळण्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे खाल्ल्यानंतर पाण्याने खळखळून चुळा भरणे.अनेकदा हे आपल्या लक्षात येत नाही किंवा चुळा भरण्याचा कंटाळा केला जाताे. नैसर्गिकरीत्या धागे असलेली आणि कडक फळे व भाज्या, रानमेवा यांचाही आहारात समावेश असणेही तितकेच गरजेचे.असे टणक पदार्थ खाताना दात आणि ताेंडाला व्यायाम हाेताेच, तसेच दात आपाेआप स्वच्छ हाेतात.दातांवर जमा हाेणारे अन्नाचे कण आणि एकूणच थर नुसत्या बाेटाने दात घासून निघत नाही. त्यामुळे दात घासण्यासाठी टूथब्रश वापरणेच याेग्य. दात घासून झाल्यावर बाेटाचा वापर करून हिरडया घासणे चांगले.टूथब्रश निवडताना त्याचे धागे मऊ किंवा मध्यम बघून घ्यावा. फार कडक धागे असलेला ब्रशटाळावा. वापरून वापरून ब्रशचे धागे वेडेवाकडे झाल्यावर किंवा झिजल्यावर ताे बदलणे आवश्यक असते.
 
दात जाेरजाेरात घासण्यापेक्षा हळुवार घासावेत.ताेंडात सर्व बाजूंनी आणि याेग्य रीतीने ब्रश फिरवून दात घासण्याची क्रिया साधारणत: दीड-दाेन मिनिटांत पूर्ण हाेते. फार वेळ दात घासत बसण्याची गरज नसते.रात्रीच्या जेवणानंतर दात घासण्यास अनेक जण विशेष महत्त्व देत नाहीत; परंतु जेवताना दातात अडकलेले अन्नकण झाेपण्यापूर्वी दात घासून काढून टाकणे आणि ताेंड स्वच्छ करणे फार गरजेचे असते. रात्री दात न घासल्यास झाेपेच्या साधारणत: आठ तासांच्या काळात दातांत अडकून राहिलेल्या अन्नकणांमुळे दात किडायला आमंत्रणच मिळते. रात्रीचे दात घासताना प्रसंगी टूथपेस्ट वापरली नाही तरी चालते, परंतु ब्रश ओला करून त्याने दात घासणे आणि चुळा भरणे आवश्यक.कधीही दात घासताना दातांबराेबर जीभही स्वच्छ करणे गरजेचे आहे. टूथब्रशच्या मागे असलेल्या खडबडीत भागाने, मऊ टूथब्रशने किंवा अगदी बाेटानेही हळुवारपणे जीभ घासता येते.
 
जीभ खडबडीत असते आणि त्यावर चवीचे ज्ञान हाेणाऱ्या ग्रंथी असतात. अन्न खाल्ल्यावर दातांप्रमाणेच जिभेवरही त्याचा पातळ थर साचत असताे आणि त्यावर जिवाणूही वाढत असतात. हा थर सकाळी आणि रात्री दात घासताना काढून टाकायला हवा.काेणतीही टूथपेस्ट वापरली तरी माैखिक आराेग्य चांगले ठेवण्यासाठी टूथब्रश जास्त मदत करीत असताे. त्यामुळे दूरचित्रवाणीवरील टूथपेस्टच्या अनेक जाहिराती अतिरंजित असतात हे लक्षात घ्यायला हवे. ब्रश भरून पेस्ट न घेता थाेडयाशाच पेस्टनेही ताेंड स्वच्छ हाेते. जाडेभरडे दंतमंजन, मिश्री किंवा राखुंडीमुळे दातांचे ङ्गइनॅमलफ झिजते. त्यामुळे ङ्गटूथ पावडरफ वापरायची असेल तर ती मऊ असेल असे पाहावे.