वेकाेली प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांवर ताेडगा काढा

    04-Apr-2026
Total Views |
 

coal 
 
वेकाेली प्रकल्पामुळे प्रभावित नागरिकांच्या प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय काेळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांची येथे भेट घेतली. वेकाेलीच्या प्रकल्पांमुळे बाधित शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर ताेडगा काढण्याची मागणी बावनकुळे यांनी केली.वेकाेली संचालक मंडळासाेबत 7 ऑक्टाेबर 2024 राेजी झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली हाेती. मात्र, संचालक मंडळाने काेणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर पावले उचललेली नाहीत. त्यामुळे प्रभावित नागरिकांमध्ये असंताेष वाढत असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याचीआवश्यकता आहे, असे बावनकुळे यांनी रेड्डी यांना सांगितले.
 
आदासा ओसी फेज-2 व सिंगाेली फेज-2 येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना राेजगार उपलब्ध करून देण्याचा मुद्दा मांडण्यात आला. तसेच, बिना-भानेगाव येथील नागरिकांचे याेग्य पुनर्वसन, जमीन अधिग्रहणासाठी न्याय्य व वाढीव माेबदला, अन्यायकारक एसओपी रद्द करणे आणि सावनेर शहरातील आरक्षण हटवणे, यांसारखे महत्त्वाचे मुद्देही बावनकुळे यांनी मांडले. काेल इंडिया आरआर पाॅलिसी 2012, तसेच आरएफसीटीएलएआरआर अ‍ॅक्टअंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र व प्रभावी धाेरण तयार करण्यावर भर द्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन रेड्डी यांनी दिल