वृषभ

    26-Apr-2026
Total Views |

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी स्थैर्यासोबत हळू हळू प्रगतीचे संकेत घेऊन येत आहे. तुम्ही तुमची कामे धैर्याने व नियोजनपूर्वक पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जाल. मनात नव्या इच्छा जन्म घेतील. त्या पूर्ण करण्यासठी तुम्हाला सतत प्रयत्न करायला हवेत.
 
नोकरी-व्यवसाय: कार्यक्षेत्र व व्यवसायात हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. कार्यस्थळावर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. जर नोकरी बदलण्यासाठी नव्या नोकरीच्या शोधात असाल तर थोडे धैर्य राखावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.
 
नातीगोती हा आठवडा भावनात्मक रुपात महत्त्वाचा राहील. कुटुंबीयासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. ज्यामुळे नात्यांमध्ये माधुर्य वाढेल. जीवनसाथीसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात स्थैर्य येईल. पण अहंकार व हटवादीपणा टाळावा.
 
■ आरोग्य : या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील पण खाणेपिणे व दिनचर्या सांभाळायला हवी. अनियमित दिनचर्या थकवू शकते. त्यामुळे शरीरात जडपणा जाणवेल. त्यामुळे तुम्ही रोज व्यायाम करायला हवा आणि त्यासोबतच पुरेशी झोप घ्यायला हवी.
 
शुभदिनांक २९, ३०, ०२
 
शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
शुभरंग निळा, जांभळा, काळा
दक्षता : या आठवड्यात आर्थिक बाबतीत बेपर्वा राहू नये व इतरांवर जास्त विश्वास ठेवू नये.
 
उपाय: शुक्रवारी लक्ष्मीमातेला पांढरे फूल व पांढरी मिठाई अर्पण करावी. घरात सुगंधित वातावरण ठेवावे.