मिथुन

    26-Apr-2026
Total Views |
 

horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी विचारांना गती देणारा व नव्या संधी घेऊन येईल. मन अनेक दिशांमध्ये सक्रिय राहील. ज्यामुळे कधी कधी गाेंधळही उडू शकताे. अशावेळी प्राथमिकता स्पष्ट असायला हवी. शब्दांची याेग्य निवड तुम्हाला नवी संधी देववू शकते. प्रवसात नव्या परिचयातून फायदा हाेईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : करिअर व्यवसाय क्षेत्रात ही वेळ नव्या संधी ओळखण्याची आहे. कार्यस्थळवावर आपली बहुमुखी प्रतिभा दिसून येईल व आपण कित्येक कामे एकत्र सांभाळू शकाल. व्यापाऱ्यांसाठी नवे संपर्क लाभदायक ठरतील. पण काेणत्याही करारावर सही करण्यापूर्वी सारे पैलू तपासून पाहावेत.
 
 नातीगाेती : नात्यांमध्ये हा आठवडा संवादावर आधारित राहील. जर आपण आपले विचार व भावना स्पष्टपणे व्यक्त कराल तर नात्यात माधुर्य वाढेल.जाेडीदार व मित्रमंडळींसाेबत आनंदात वेळ घालवाल. प्रेमसंबंधात उत्साह राहील पण काेणताही गैरसमज वेळीच दूर करावा.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण मानसिक व्यस्ततेमुळे थकवा जाणवण्याची श्नयता आहे. तुम्ही तुमची दिनचर्या नियमित राखायला हवी व पुरेसा आराम करायला हवा. श्वासाेच्छवासासंबंधित अभ्यास व थाेडासा व्यायाम तुम्हाला संतुलीत ठेवील.
 
 शुभदिनांक : 29, 30, 02
 
 शुभरंग : निळा, जांभळा, काळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात एकाच वेळी खूप सारी कामे करणे टाळावे. निर्णय घेताना गाेंधळ व घाई टाळावी.
 
 उपाय : बुधवारी हिरवे वस्त्र धारण करावे. हिरव्या भाज्या दान द्याव्यात व श्रीविष्णूचे ध्यान करावे.