चांगला पिता असण्याची लक्षण

    15-Apr-2026
Total Views |
 
 
 
father
मायेचा ओलावा: पिता म्हणून मुलांविषयी मायेचा ओलावा असला पाहिजे. मुलांना मायेचा स्पर्श, पाठीवरील थाप, काैतुक या सगळ्या गाेष्टी हव्या असतात. त्यांना प्रेम हवे असते. ते वडिलांच्या वागण्याबाेलण्यातून आणि कृतीतून दिसावे अशी मुलांची अपेक्षा असते. त्यामुळे मुलांना अधूनमधून मिठीत घेणे, त्यांच्या पाठीवरून आश्वासक हात िफरवणे, शाबासकी देणे आवश्यक असते. अशा छाेट्या कृतीमधून मुलांचा आत्मविश्वास वाढताे.
 
मुलांचे शांतपणे ऐकून घ्या: चांगला पिता मुलांना काय म्हणायचे आहे हे शांतपणे समजावून घेताे. केवळ ऐकून घेण्यापेक्षा मुलांना काय म्हणायचे आहे हे समजावून घेणे महत्त्वाचे असते. एखादी घटना मुलांच्या दृष्टीकाेनातून समजावून घेणे आवश्यक असते. मुलांना काय कळते असे म्हणून मुलांना गृहित धरू नये.काहीवेळा मुलांना वाईट अनुभव आलेला असताे किंवा त्यांच्याशी कुणीतरी गैरवर्तन केलेले असते. अशावेळी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकणे, त्यांना दिलासा देणे, आधार देणे त्यांना बळ देणारे ठरते.मुलांची काळजी ः चांगला पिता मुलांची याेग्य ती काळजी घेताे. त्यांच्या हिताच्या गाेष्टी त्यांना सांगताे. मर्यादांची जाणीव करून देताे. मुलांनी कुठल्या गाेष्टीबाबत जागरुक राहायला हवे, लाेकांशी कसे वागावे याचे मार्गदर्शन चांगले वडिल मुलांना देतात.
 
वागण्यातील हळुवारपणा, आपुलकी: अनेक घरांमध्ये वडील हे मुलांना मारहाण आणि शिवीगाळ करणारे असतात. त्यामुळे अनेक मुलांचे जीवन काेमेजून जाते. ही मुले कायम भितीच्या छायेखाली वावरत असतात. त्यांच्यामध्ये स्व-प्रतिष्ठा कमी हाेत जाते. प्रेम म्हणजे काय आणि ते कसे द्यायचे असते, मिळत असते हे त्यांना समजत नाही. कारण ती वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली असतात.
 
वडील उदाहरण घालून देतात: मुलांना उदाहरण घालून देतात ः चांगले वडील मुलांना असे कधीच म्हणत नाही की, मी सांगेन तसेच वागायचे. मी सांगेन तेच करायचे. उलट मुलांनी कसे वागावे याचे उदाहरण ते स्वतःच्या वागण्यातून घालून देतात. वाद आणि मतभेदांच्या प्रसंगात कसे वागावेत या गाेष्टी वडील मुलांना उदाहरणातून शिकवतात.