विशेष कामगिरी करणाऱ्या जवानांना पदक देणार : मुख्यमंत्री

    01-Apr-2026
Total Views |
 

mao 
 
माओवादाविराेधातील लढ्यात महाराष्ट्र पाेलिसांनी निर्णायक यश मिळवले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष सी-60 पदक देण्याची घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाेलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली.या परिषदेस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भाेयर, गृह राज्यमंत्री (शहरे) याेगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पाेलीस महासंचालक सदानंद दाते; तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.पाेलीस यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देऊन गुन्हे अन्वेषण आणि न्यायप्रक्रियेत डिजिटायझेशन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
नवी मुंबईत राबवण्यात आलेल्या ब्लाॅकचेन आधारित एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीमप्रमाणे प्रणाली राज्यभर लागू केल्यास पुराव्यांतील छेडछाड राेखता येईल. पुढील सहा महिन्यांत सर्व पाेलीस ठाण्यांत ही प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सायबर सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मशी अधिक प्रभावी समन्वयाची गरज व्य्नत केली. आक्षेपार्ह किंवा धाेकादायक मजकूर हटवण्यासाठी विलंब टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. सायबर स्पेसमध्ये वाढणाऱ्या रॅडिकलायझेशनकडे लक्ष वेधत यावर उपाययाेजना करण्याचे निर्देशही त्यांनी पाेलिस यंत्रणांना केले.पाेलीस दलात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्राेत्साहन देण्यासाठी दरमहा पुरस्कार याेजना सुरू करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी पाेलीस महासंचालकांना केली; तसेच अपेक्षित कामगिरी न करणाऱ्यांना याेग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.