हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात चाैथी महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा; तसेच विविध गटांतील पुरुष कुस्ती स्पर्धे साठी 25 लाखांचा निधी देण्यात येत आहे. पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी 50 लाखांचा निधी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे.महिला कुस्ती स्पर्धेला शासनाचा भ्नकम पाठिंबा असल्याचे साेलापूरचे पालक मंत्री जयकुमार गाेरे यांनी सांगितले. येथे आयाेजित महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा कुस्ती स्पर्धेच्या समाराेपप्रसंगी गाेरे बाेलत हाेते.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, नगरसेविका राेहिणी तडवळकर, सुधा माेरे, अ्नकलकाेट अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भाेसले, स्वाती साखरे आदी मान्यवर उपस्थित हाेते. स्पर्धेतील अंतिम सामन्यात काेल्हापूरच्या अमृता पुजारीने हिंदकेसरी किताब पटकावला. अमृता पुजारीस गाेरे यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. या स्पर्धेला नागरिकांचा माेठा प्रतिसाद मिळाला.