कामाच्या ठिकाणी समानतेचा नेहमी उद्घाेष हाेत असला तरी प्रत्यक्षात नाेकरी शाेधताना किंवा नाेकरीच्या ठिकाणी स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. काही गाेष्टी बदलल्या असल्या, बदलत असल्या तरी अजून खूप काही बदलणे गरजेचे आहे.अनेकदा स्त्रिया कामाच्या ठिकाणी पुरूषी वर्चस्व आणि राजकारणाच्या बळी ठरतात. विशेषतः नाेकरी शाेधताना आणि मिळवताना तर प्रत्येक टप्प्यावर त्यांना निरुत्साहित केले जाते. त्यामुळे नाेकरी शाेधताना हे नेहमीच टक्केटाेणपे किवा खड्डे वगळून आत्मविश्वास दाखवण्याची गरज असते. त्यासाठी काय करू नये याविषयी...
नकाराला घाबरू नका: सध्याच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये स्त्रिया जास्त प्रामाणिकपणे काम करत असल्याचा अनुभव येताे. त्याचवेळी अगदी खेळापासून ते राजकारणापर्यंत स्त्रीमध्ये काहीतरी उणीवा असल्याची भावना पुरुष वर्गात असते. एकूणच समाजात ही मानसिकता असल्यामुळे अनेकदा मुली नवीन गाेष्टी करण्यास किंवा वेगळ्या, आव्हानात्मक ठिकणी नाेकरीसाठी अर्ज करण्यास बिचकतात. कारण आपल्याला तिथून नकार मिळाला तर, असे त्यांना वाटत असते. असा विचार नाेकरी शाेधताना अजिबात करू नका.
आत्मविश्वास कायम ठेवा: काही वेळा मुलाखतीदरम्यान बाेलताना नीट शब्द आठवत नाही किंवा काय म्हणायचे आहे ते नेमकेपणाने मांडता येत नाही. त्यासाठी जे काही बाेलायचे असते त्याचा थाेडा सराव करा आणि स्वतःच्या बाेलण्यावर ठाम रहा.अनेकदा स्त्रियांना स्वतःचे मत नसते, त्यांना मत बनवता येत नाही असा समज हाेताे ताे ठाम आत्मविश्वासाच्या अभावी.
नियमांवर जाऊ नका: एखाद्या विशिष्ट पदासाठी शंभर टक्के पात्र असल्याशिवाय अनेकदा महिला नाेकरीसाठी अर्ज करतच नाहीत. कारण त्या पदासाठी अर्ज करतानाची मार्गदर्शक नियम. जेव्हा तुम्ही नाेकरीचा विचार करत असता तेव्हा असल्या नियमांचा विचार करू नका. तुम्हांला हव्या असलेल्या पदासाठी अर्ज करा. कारण अनेकदा तुमच्यापेक्षा कमी पात्रता असलेले पुरुष अर्ज करतात आणि त्यांची निवडही हाेते कारण सगळ्या निकषात बसणारा कुणीच उमेदवार आलेला नसताे.