आराेग्यसंपन्न गाव राज्यव्यापी अभियानास आजपासून प्रारंभ

    01-Apr-2026
Total Views |
 

Health 
 
राज्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामाेहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आराेग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव-आराेग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला 1 एप्रिलपासून प्रारंभ हाेत आहे.हे अभियान फ्नत सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता लाेकसहभागाद्वारे त्यातून व्यापक आराेग्य चळवळ उभी राहावी, असा राज्य शासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव आराेग्यसंपन्न केले जाणार आहे. या प्रस्तावित याेजनेमुळे गावापासून ते राज्य स्तरावरील आराेग्य सेवांचे आणि यंत्रणांचे सक्षमीकरण हाेण्यास मदत हाेणार आहे. या उपक्रमामुळे तळागाळातील नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पाेहाेचणार आहेत.
 
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरापासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत तीन टप्प्यांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आराेग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती अभियानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. आराेग्य विभागाच्यप्रधान सचिवांच्या नेतृत्वाखालील कृती समिती प्रत्यक्ष कामाचे नियाेजन करणार आहे. गाव पातळीवर आराेग्याचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष ठरवण्यात आले आहेत.या निकषांच्या आधारे 70 ट्न्नयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना आराेग्यसंपन्न गाव म्हणून गाैरवण्यात येणार आहे. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि राेख पुरस्कार देऊन प्राेत्साहित केले जाणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारने 80.75 काेटींचा निधी मंजूर केला आहे. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गाव, प्राथमिक आराेग्य केंद्रास काेट्यवधी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.