ब्रिटिशांना भारतावर राज्य करायचे हाेते म्हणून त्यांनी राज्यकर्त्यांच्या भूमिकेतून फाैजदारी कायदे आणले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात या कायद्यांमध्ये बदल करून नागरिकांच्या सेवेसाठी फाैजदारी कायदे तयार झाले. त्यामुळे देशात पाेलीस व्यवस्था आणि अपराधिक न्याय प्रणालीत सुसूत्रता येऊन नागरिकांना जलद व याेग्य न्याय मिळत आहे. सर्व राज्यांनी या कायद्यांची उत्तम अंमलबजावणी सुरू केली असून, शासन व पाेलिसांचे कार्य नागरिकांची सेवा करणे असल्याचे यातून अधाेरेखित हाेत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.येथील पाेलीस मुख्यालयातील शिवाजी क्रीडांगणावर आयाेजित 69व्या अखिल भारतीय पाेलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, पाेलीस महासंचालक सदानंद दाते, नागपूरचे पाेलीस आयु्नत डाॅ. रवींद्र सिंघल आदी मान्यवर उपस्थित हाेते.
गुन्हे शाेधात व्यावसायिक काैशल्य, न्याय वैद्यक विज्ञान, संगणक प्रणाली आणि श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर या मेळाव्यात चर्चा, परिसंवाद, स्पर्धा हाेणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील चांगल्या कार्यपद्धतीची देवाण-घेवाण हाेणार आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या चांगल्या कार्यपद्धती या कर्तव्य मेळाव्याच्या माध्यमातून इतर राज्यांना कळणार असून, अन्य राज्यांतील चांगल्या कार्यपद्धतीचीही ओळखही हाेणार आहे. या मेळाव्यात सहभागी प्रत्येकजण आपले काैशल्य पणाला लावून उत्तम प्रदर्शन करतील, अशा भावना व्य्नत करून मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.पाेलीस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रास्ताविक केले, तर डाॅ. सिंघल यांनी आभार मानले. 3 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या कर्तव्य मेळाव्यात 29 राज्ये, केंद्रशासित प्रदेश; तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे 1327 पाेलीस अधिकारी आणि अंमलदार, 146 श्वान सहभागी झाले आहेत.