अटल सेतू थेट आता अलिबागला जाेडणार; प्रकल्पाची तयारी सुरू

    01-Apr-2026
Total Views |
 
 

atal 
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न साकारल्यानंतर सिडकाेने आता या परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार मुंबई-नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या अटल सेतूला थेट विमानतळ, जेएनपीए आणि पुढे अलिबागला जाेडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून उलवे काेस्टल राेडचा विस्तार करून ताे रेवस-करंजा खाडीपुलाशी जाेडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला असून, त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई-अलिबाग प्रवास केवळ दीड तासात हाेईल.
 
या मार्गाच्या विस्तारामुळे अटल सेतूपासून द्राेणागिरीमार्गे करंजा-रेवस पुलापर्यंत अखंड काेस्टल काॅरिडाॅर उभा राहणार असून नवी मुंबई,नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि काेकणातील कनेक्टिव्हिटी माेठ्या प्रमाणात सुधारेल. परिणामी, वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत हाेण्याची अपेक्षा व्य्नत हाेत आहे. सध्या अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जाेडणारा 7 किमी.चा सहा-लेन उलवे काेस्टल राेड उभारला जात आहे. या मार्गाचा पुढील टप्पा म्हणून द्राेणागिरीमार्गे करंजा खाडीपुलापर्यंत विस्तार करण्याचा सिडकाेचा मानस आहे. त्यासाठी तांत्रिक अभ्यास, पर्यावरणीय परिणामांचा आढावा आणि खर्चाचा अंदाज तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सिडकाेने दिली आहे.