डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करणार : बनसाेडे यांची माहिती

    01-Apr-2026
Total Views |
 
 

ambedkar 
 
 
मुंबईतील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसाेडे यांनी सांगितले. बनसाेडे सध्या दिल्ली दाैऱ्यावर असून, त्यांनी गाझियाबादेत प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिली. इंदू मिल स्मारकासाठी तयार हाेत असलेल्या डाॅ. आंबेडकर पुतळ्याच्या कामाची त्यांनी सविस्तर पाहणी करत कामाचा आढावा घेतला.महाराष्ट्र सदनात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य धातूंच्या जागतिक दरात झालेल्या वाढीमुळे प्रकल्पाच्या मूळ निविदा दरांत आणि सध्याच्या वास्तविक खर्चात तफावत निर्माण झाली आहे.त्यामुळे अतिर्नित निधीची तातडीने तरतूद करणे आवश्यक आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे बनसाेडे यांनी सांगितले.