बदलत्या काळात आयुष्यभर एकाच नाेकरीत राहणे शक्य नसते. नव्या संधी, प्रगती, वेतनवाढ अशा अनेक कारणांमुळे नाेकरी बदलणाऱ्यांच्या संख्येत माेठी वाढ झालेली आहे. सध्याच्या काळात नाेकरी बदलायची म्हटले तर नव्या संधीसाठी नेटवर्किंग आवश्यक ठरते.तुमची पात्रता, काैशल्य, अनुभव, कामगिरी याविषयीची माहिती तुमच्या क्षेत्रातील तज्ञांना, जाणकारांना, वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्यांना असावी लागते. त्या दृष्टीने नेटवर्किंग उपयुक्त ठरते. नाेकरीसाठी विविध साईटवर शाेध घेण्याबराेबरच आणखी विशेष प्रयत्न करून तुम्ही काेणत्या क्षेत्रात एक्स्पर्ट आहात तुमची काैशल्ये आणि वैशिष्ट्ये काय आहेत हे प्राेेशनल्सच्या विविध ग्रुपमध्ये पाेचवणे महत्वाचे ठरते.त्यादृष्टीने तुम्ही नेटवर्किंग केले असले पाहिजे.
तुम्ही नव्या नाेकरीच्या शाेधात असाल तर तुमची संधीकडे पाहण्याची दृष्टी आणि कृती परस्थितीला अनुकूल अशी असली पाहिजे. प्रामाणिक, कष्टाळू आणि रिझल्ट देणाऱ्या मनुष्यबळाची कायम सगळीकडे गरज असते आणि विविध कंपन्या त्याच्या शाेधात असतात.त्यामुळे तुम्ही या संधीचे साेने कसे करता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते.आपल्या क्षेत्रातील प्राेेशनल्सशी, वरिष्ठांशी, तज्ज्ञांशी संपर्क ठेवण्यासाठी लिंकड् इन, ट्विटर यांचा वापर करा.तुमची प्रतिमा म्हणजेच व्यक्ती म्हणून तुमचा पर्सनल ब्रँड तयार हाेण्यासाठी त्याचा उपयाेग हाेताे. तुमची आतापर्यंतची कामगिरी बुलेट पाॅईंटद्वारे रेझ्युमीमध्ये हायलाईट करा. कारण प्रत्येकजण सगळा रेझ्युमी वाचण्याच्या ंदात पडत नाही. बुलेट पाॅईंटने हायलाईट झालेला एखादा मुद्दा क्लिक हाेऊन तुम्हांला संधी मिळण्याची शक्यता निर्माण हाेते.
तुम्ही ज्या क्षेत्रात आणि पदावर काम करण्यासाठी इच्छुक आहात फक्त त्यासंदर्भातील अनुभव लिहा. बाकीच्या ाफटपसाऱ्याला काहीही महत्व नसते.कारण तुम्हांला संधी देणारी व्यक्ती तुम्ही संबंधित जबाबदारी पार पाडू शकाल की नाही याची चाचपणी करत असताे.नवीन संधी घेताना सध्या कार्यरत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनाला अजिबात दुखावू नका, त्यांच्याबद्दल अपप्रचार करू नका. कारण तुमच्या क्षेत्रात परत कधी तरी तुमचा त्यांच्याशी संबंध येण्याची शक्यता असते.त्याचबराेबर अशा वर्तनातून तुमची मानसिकता दिसून येते.क्षमतेपेक्षा जादा वेतनाची अपेक्षा ठेवणे नेहमी अव्यवहार्य ठरते. अनेकदा तुमच्या क्षमतेपेक्षा कमी वेतन घेणे ायद्याचे असते.