पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने आता भारतातील लग्नांच्या सनई-चाैघड्यांवर चिंतेचे सावट आणले आहे.या युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी सिलेंडर (स्वयंपाकाचा गॅस) टंचाईने ऐन लग्नसराईच्या हंगामात माेठे संकट उभे केले आहे. गॅसचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे लग्न नियाेजक (वेदिक) आणि केटररर्सना त्यांच्या पदार्थांच्या यादीत (चशर्पी) कपात करावी लागत आहे, तर दुसरीकडे खर्च वाढत असल्याने अनेक पाहुण्यांच्या संख्येत घट करत आहेत.प्रणय वेडिंग्स या प्रसिद्ध वेडिंग प्लॅनर कंपनीचे संस्थापक श्रीराम कल्याणसुंदरम सांगतात की, त्यांच्याकडे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यासाठी अनेक भव्य लग्नसाेहळे नियाेजित हाेते. मात्र, गॅसच्या संकटामुळे हे भव्य साेहळे आता साध्या पद्धतीचे झाले आहेत. पाहुण्यांची संख्या कमी करण्यात आली असून, मेनूमधील पदार्थांची संख्याही घटली आहे.
ते म्हणतात, ‘गेल्या चार दिवसांपासून आम्हाला माेठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पुढच्या आठवड्यातील सर्व लग्नांचा मेनू आम्ही बदलला आहे. गॅस शेगड्यांचा तुटवडा असल्याने आम्ही ‘लाईव्ह काउंटर्स’ बंद करत आहाेत आणि ज्या पदार्थांसाठी जास्त गॅस लागताे, ते टाळत आहाेत.’ या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांचे पथक आता अनेक पदार्थांसाठी पारंपरिक लाकूड इंधन म्हणून वापरून स्वयंपाक करण्यावर भर देत आहे. चेन्नईच्या बाजारपेठेत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. संकटापूर्वी जाे सिलिंडर 1,500 रुपयांना मिळत हाेता, ताे आता 4,500 रुपयांपर्यंत पाेहाेचला आहे.सीएआयटीचे अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणतात, ‘युद्धामुळे अन्नाच्या बाबतीत काही प्रमाणात शिस्त किंवा टंचाई येऊ शकते, पण इतर बाबींवर याचा फारसा परिणाम हाेणार नाही.
मात्र, लग्नांचा मुख्य हंगाम एप्रिल-मे मध्ये सुरू हाेत असताना, एलपीजीच्या टंचाईने नियाेजित कामांबद्दल अनिश्चितता निर्माण केली आहे.दरराेजच्या इतर कार्यक्रमांपेक्षा केटरिंगमध्ये गॅसचा वापर खूप जास्त असताे आणि तिथे वेळेचे बंधन पाळावे लागते. काेलकाता येथील स्वीट-एन-साेअर केटरिंग सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, ‘आम्ही ग्राहकांशी चर्चा केल्याशिवाय मेनू बदलू शकत नाही,’ पण ज्यांचे कार्यक्रम मार्चअखेर आहेत त्यांना आम्ही आधीच पूर्वकल्पना देत आहाेत.प्रसिद्ध कापड उद्याेजक नल्ली कुप्पूस्वामी चेट्टी यांच्या मते, ‘कापड बाजारावरही याचा काही प्रमाणात परिणाम दिसत आहे. लाेक पाहुण्यांचीसंख्या कमी करत आहेत. लग्नात साड्या आणि इतर वस्तू देण्याची परंपरा आहे, पाहुणे कमी झाले की या कपड्यांच्या खरेदीवरही परिणाम हाेऊ शकताे,’ असे त्यांनी सांगितले. भारतमॅट्रिमाेनी या प्लॅटफाॅर्मवरून दरराेज 1,500 हून अधिक लग्ने लावली जातात. सध्या त्यांच्या उद्याेगावर थेट परिणाम दिसत नसला तरी, पश्चिम आशियातील विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे काही लग्ने लांबणीवर पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
फेडरेशन ऑफ हाॅटेल अँड रेस्टाॅरंट असाेसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले की, ‘हाॅटेल्स आता अशा पर्यायी मेनूचा विचार करत आहेत ज्यात गॅसचा वापर कमी हाेईल. काही ठिकाणी कार्यक्रम 15 ते 20 दिवसांसाठी पुढे ढकलले जात आहेत.’ दिल्लीतील हाजी केटरिंग सर्व्हिसचे इम्रान खान सांगतात की, ‘ते सिलिंडरसाठी दुप्पट किंमत माेजत आहेत. आम्ही ग्राहकांकडून जास्तीचे पैसे मागू शकत नाही कारण वेळेवर सेवा देणे आमचे कर्तव्य आहे, असे ते म्हणतात. तर जयपूरमधील राजश्री केटरर्सच्या कामगारांनी सांगितले की, त्यांच्याकडे असलेला गॅसचा साठा अवघा 4 ते 5 दिवस पुरेल एवढाच आहे.दक्षिण भारतातही परिस्थिती वेगळी नाही.तमिळनाडूतील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णा रेस्टाॅरंट साखळीचे मालक डी. श्रीनिवासन यांनी सांगितले की, त्यांच्या रेस्टाॅरंटमध्येही एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे आणि ते कमीत कमी गॅस वापरून काम करत आहेत.