उच्च रक्तदाबात फायदेशीर आहे अश्वगंधा

    31-Mar-2026
Total Views |
 

Health 
 
अश्वगंधाच्या सेवनाने रक्तदाब वाढताे हा एक सर्वसामान्य गैरसमज आहे.अश्वगंधा एखाद्या जादूच्या बुटीसारखी असून ज्याचा बीपीसह संपूर्ण शरीरावर चांगला परिणाम हाेताे. अनेक अध्ययन हे सिद्ध करतात की, अश्वगंधाच्या सेवनाने तणाव आणि चिंता कमी हाेतात. ज्या उच्च रक्तदाब वाढवण्यात माेठी भूमिका बजावतात.शाेधानुसार अश्वगंधा, टाेटल आणि एलडीएल काेलेस्ट्राॅल (खराब काेलेस्ट्राॅल) कमी करण्यास उपयुक्त हाेऊ शकते. ही एक अडाप्टाेजेनिक जडीबूटी आहे, जी बीपी साेबत सूज आणि तणाव ही कमी करू शकते.
 
दुपारी वा रात्री जेवणानंतर अश्वगंधाचा चहाही पिऊ शकता.अश्वगंधा वा विथानिया साेम्निफेरा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये मिसळले जात आहे. नुकतेच काही वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे उच्च रक्तदाबाच्या स्थितीतही याचा उत्तम परिणाम मिळत असल्याचे सांगत आहेत. तसा काेणत्याही प्रकारचाा भक्कम दावा पुढे हाेणाऱ्या गहन अध्ययनानंतरच करता येऊ शकताे.हायपरटेंशन रुग्णांनी याचे सेवन आयुर्वेदिक विशेषज्ञांच्या सल्ल्यानंतरच करायला हवे. रुग्णाची स्थिती, लक्षणे, पूर्वी चालू असलेले उपचार इ.च्या आघारेच हे ठरवले जाऊ शकते की, व्यक्तीसाठी याचे सेवन किती याेग्य राहील.