केवळ मित्रांसाेबत वेळ घालवून खरा मित्र कळत नाही. तुम्हांला अनेक मित्र असतील पण त्यातील खरे मित्र किती हे सांगता येत नसते. खरा मित्र ठरण्यासाठी काही कसाेट्या पार कराव्या लागतात.त्यातील महत्त्वाची म्हणजे निस्वार्थीपणा.खरा मित्र काेण हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी पुढील मुद्यांचा विचार करा.
तुम्हांला काय सांगायचे आहे ते समजून घेताे: तुमचा मूड कसा आहे, वेळ काय आहे असल्या गाेष्टींचा विचार न करता खरा मित्र नेहमी आपले ऐकून घेताे. त्यासाठी ताे काेणतीही कारणे सांगत बसत नाही.
ताे नेहमी तुमच्याशी प्रामाणिक असताे: खरा मित्र नेहमी आपल्याशी प्रामाणिकपणे वागताे. ताे कधीही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा विश्वासघात करत नाही. पाठीमागे आपल्याविषयी वाईट बाेलण्याचा विचारही त्याच्या मनात येत नाही.उलट खाेटी माहिती किंवा अफवा पसरवण्यापासून ताे दूर राहताे.आपल्या नकळत कुणी आपल्याविषयी चुकीची माहिती पसरवत असेल तर खरा मित्र त्यात सहभागी हाेत नाही.उलट असे करणाऱ्यांना राेखण्याचा त्याचा प्रयत्न असताे.
मदतीसाठी 24 तास तयार: जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा खरा मित्र नेहमी धावून येताे. समस्येतून काही ना काही मार्ग काढण्याची त्याची धडपड ही मनापासूनची असते.