अनेक लाेकांना गाडी चालवता येत नाही, पण ब्लाॅब नावाच्या एका इटालियन माशाने गाडी चालवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ब्लाॅबने गाडी चालवून गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड प्रस्थापित केला आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की मासे कधीही गाडी चालवू शकत नाहीत, पण एका माणसाने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याद्वारे ब्लाॅबने गाडी चालवली.याबाबतची गाेष्ट अशी आहे की, नेदरलँड्समधील थाॅमस डी. वुल्फ नावाच्या एका व्यक्तीने अशी माेशन-सेन्सिंग गाडी विकसित केली आहे, जी एका लहान मत्स्यालयात ठेवलेल्या ब्लाॅबच्या पाेहण्याच्या गतीनुसार चालते.
माेशन-सेन्सिंग वाहन असल्याने, मासा जितका जास्त हलताे, तितकी गाडी जास्त हलते. ही गाडी टाकीतील गाेल्डफिशच्या हालचालीनुसार चालते.गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड प्रस्थापित करण्यासाठी, गाेल्डफिशला एका वेळी किमान 15 फूट गाडी चालवावी लागली. तथापि, या फुगीर गाेल्डफिशने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली. त्याने एका मिनिटात गाडी एकूण 40 फुटांपेक्षा जास्त ओढली.गाडीमध्ये माेशन-सेन्सिंग कॅमेरा बसवलेला आहे, त्यामुळे गाडी टाकीतील माशाच्या दिशेनेच धावते. अशा प्रकारे, या उपकरणाचा काही अर्थ लागत नाही, पण या व्यक्तीला हे उपकरण बनवण्यात आणि विशिष्ट आज्ञा देऊन गाेल्डफिशला धावण्याचे प्रशिक्षण देण्यात खूप प्रयास करावा झाला.