33% जेन-झीला आज्ञाधारक पत्नी पाहिजे : जागतिक सर्वेक्षण

    30-Mar-2026
Total Views |
 

z 
 
1997 नंतर जन्माला आलेली पिढी, ज्याला जेन-झी म्हटले जाते, ती आतापर्यंतची सर्वात आधुनिक आणि खुल्या विचारांची पिढी आहे, असे आपण सर्वसाधारणपणे मानताे, परंतु नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वे क्षणाने ही या धारणेला छेद दिलेला आहे.लंडनच्या किंग्ज काॅलेजमधील ग्लाेबल इन्स्टिट्यूट फाॅर विमेन्स लीडरशिपच्या भागीदारीत इप्साेसने 29 देशांतील 23,000 तरुणांचे सर्वेक्षण केले. त्यातून आजचे तरुण आपल्या अधिक जुनाट विचारांचे आणि पुराणमतवादी आणि जुन्या विचारांचे आहेत.आपल्या पत्नीच्या आणि घराच्या निर्णयांबद्दल तरुणांचे काय मत आहे?
 
सर्वेक्षण आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की लग्न आणि घराच्या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल तरुणांचा विचार जुन्यापिढीसारखाच असल्याचे दिसून आले आहे.आज्ञाधारक पत्नी हवी आहे : सुमारे 33% जेन-झी तरुणांना त्यांचीपत्नी आज्ञाधारक असावी आणि त्यांच्या प्रत्येक गाेष्टीचे पालन करावे अशी इच्छा आहे. माेठ्या घरगुती निर्णयांमध्ये पतीचे अंतिम मत असले पाहिजे, असेही त्याने वाटते.जुन्या पिढीशी तुलना : आश्चर्याची गाेष्ट म्हणजे बेबी बूमर पिढीतील (1946-1964 या काळात जन्मलेल्या) केवळ 13% पुरुषांना असे वाटते. केवळ मुलगेच नव्हे तर 18% जेन-झी मुलींचा असे वाटते, की पत्नीने नेहमी पतीच्या सांगण्याचे, आदेशाचे पालन केले पाहिजे.