महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनास दिल्लीतील प्रदर्शनात माेठा प्रतिसाद

    03-Mar-2026
Total Views |
 
 

tourism 
दक्षिण आशियातील अग्रगण्य बी 2 बी प्रवास व पर्यटन प्रदर्शन सट्टेच्या (साउथ एशियाज ट्रॅव्हल अ‍ॅड टूरिझम एक्सचेंज- एसएटीटीई) 32 व्या आवृत्तीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने भाग घेऊन विशेष दालन उभारले.या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या दालनाने देश- विदेशांतील पर्यटक व व्यावसायिकांचे लक्ष वेधून घेतले. या दालनाचे उद्घाटन पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आले. या प्रदर्शनात 50 हून अधिक देश व 28 राज्यांतील पर्यटन मंडळांनी भाग घेतला हाेता.महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक संताेष जाधव, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व उपसंचालक पर्यटन विजय जाधव यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यावसायिकांशी संवाद साधला.राज्यातील पर्यटनाच्या संधींबाबत या प्रदर्शनात माहिती देण्यात आली.