जल्लीकट्टू विजेत्याला सरकारी नाेकरी

    03-Mar-2026
Total Views |
 
 
 
 

TN 
 
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मदुराईतील अलंगनल्लूर येथे जल्लीकट्टू खेळादरम्यान एक अनाेखी घाेषणा केली. त्यांनी सांगितले की, जी व्यक्ती सर्वात जास्त बैलांवर विजय मिळवेल त्याला पशुपालन विभागात सरकारी नाेकरी दिली जाईल. बैलपालकाच्या शिक्षण आणि क्षमतेवर आधारित सरकारी नाेकऱ्यांची घाेषणा केल्याने अनेक तरुण ही स्पर्धा जिंकण्यास उत्सुक हाेते. जल्लीकट्टूमध्ये जल्ली म्हणजे साेन्या-चांदीची नाणी आणि कट्टू म्हणजे बांधलेले. जुन्या काळात बैलाच्या शिंगांना नाणी बांधली जात असत. ते बैल गर्दीत साेडले जातात आणि खेळाडूला त्यांना पकडावे लागते आणि नियंत्रित करावे लागते. जिंकणारा बैल बाजारात त्याची किंमत वाढवताे.