अचानक नाेकरी गेली, काेणी साेडून गेले, किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला कायमचे गमावले... अशा ध्न्नयानंतर मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे : माझ्यासाेबतच असे का घडले?
‘्नलाेजर’च्या जाळ्यात अडकण्याची श्नयता
हा प्रश्न आपल्याला विचारांच्या अशा जाळ्यात अडकवताे जिथे आपण सतत उत्तरे शाेधत राहताे.मानसशास्त्रीय भाषेत, याला ‘्नलाेजर’ असे म्हणतात.याचा अर्थ एखाद्या घटनेला समजून तीला मनात तसेच स्थान देणे. सामान्यतः असे मानले जाते की ‘्नलाेजर’ मिळाल्यावर मनाला शांती मिळते.
प्रत्येक घटनेचा शेवट आनंदी नसताे
मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, जीवनातील प्रत्येक कथेचा शेवट आनंदी नसताे. मेरीलँड विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक एरी डब्ल्यू. क्रुगलांस्की यांनी सांगितले की, ‘्नलाेजर’ ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये व्य्नतीला वाटते की, आता निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती आहे.
व्य्नतीनुसार बदलते ‘्नलाेजर’चे स्वरूप
क्रुगलांस्की यांनी संशाेधनाने दाखवून दिले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘्नलाेजर’ची गरज एकसारखी नसते. ती व्य्नितपरत्वे बदलते. काही लाेक अनिश्चितता सहन करू शकत नाहीत. त्यांना जलद निकाल हवे असतात. तर काही अनुत्तरीत प्रश्नांसह जगू शकतात. डाॅ. एरी डब्ल्यू. क्रुग्लांस्की असेही सांगतात की, ‘्नलाेजर’ने नेहमीच आराम मिळत नाही.
बालपणीचे अनुभव महत्त्वाचे
बालपणीचे अनुभव यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असे तज्ज्ञ सांगतात. जे लाेक अस्थिर किंवा असुरक्षित वातावरणात वाढतात, त्यांना भविष्याविषयी जास्त चिंता सतावतात. त्यांच्यामध्ये ‘्नलाेजर’ची इच्छाही जास्त असते.
अनुभवांमधून शिका व संतुलित राहा
नाॅर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्राेफेसर डॅन पी. मॅकअॅडम्स यांनी सांगितले की, जे लाेक भूतकाळातील नकारात्मक घटनांना शिकणे आणि नवीन संधी म्हणून पाहतात ते जास्त संतुलित राहू शकतात. उदाहरणार्थ, घटस्फाेटाला शेवट म्हणून नव्हे तर नवीन सुरुवात म्हणून पाहतात.प्रत्यक्षात, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळण्याची आवश्यकता नसते. सतत दुःखाचा विचार करत बसणे, आराेग्यास घातक असते. कधी कधी जीवन आपल्याला पुढे जाण्याची परवानगी तेव्हा देते जेव्हा आपण काही प्रश्न तिथेच साेडून द्यायला शिकताे.