एचपीव्ही लसीकरण माेहिमेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

    03-Mar-2026
Total Views |
 

HPV 
 
देशाची ‘नारी शक्ती’ सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आराेग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण माेहिमेचा प्रारंभ हा महत्त्वाचा टप्पा आहे.महिलांचे आराेग्य व सन्मानाबाबत सरकारची भूमिका संवेदनशील असून, संवेदनशीलतेची संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे गाैरवाेद्गार पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काढले.पंतप्रधानांनी अजमेरमधून देशव्यापी एचपीव्ही लसीकरण माेहिमेचा प्रारंभ केला. या समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले हाेते.
 
यावेळी वित्त व नियाेजन राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सार्वजनिक आराेग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ. निपुण विनायक, प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी उपस्थित हाेते.या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते वीज, पाणी, रस्ते, आराेग्य आणि शिक्षण यासह सुमारे 17000 काेटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्काद्वारे आधुनिक जाेडणीमुळे राजस्थानचे भवितव्य बदलते आहे.दिल्ली-मुंबई औद्याेगिक काॅरिडाॅरच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे राजस्थान जागतिक गुंतवणुकीसाठी ‘संधींची भूमी’ बनत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.