चेहऱ्यावर वाफ घेणे जरा जास्तच हानिकारक हाेऊ शकते

    27-Mar-2026
Total Views |
 

Health 
 
तसा तर काेणताही साैंदर्याेपचार याेग्य प्रशिक्षणाअभावी करणे घातक ठरू शकते, पण चेहऱ्यावर वाफ घेणे जरा जास्तच हानिकारक हाेऊ शकते. वाफ घेण्याविषयी अनेक समज आहेत. काही साैंदर्यविशेषज्ञांचे मत आहे की, वाफ घेणे याेग्य आहे कारण यामुळे त्वचेची बंद रंध्रे उघडतात व रंध्रात दडलेला सारा मळ बाहेर आल्यामुळे त्वचा स्वच्छ राहते.पण काही त्वचा विशेषज्ञ विशेषकरून हबल ट्रीटमेंटवर विश्वास करणारे मानतात की, वाफ घेणे हानिकारक ठरू शकते.असेच एका साैंदर्य विशेषज्ञाचे मत आहे की श्नयताे वाफ घेऊच नये. त्वचेची सफाई तर फेशियलच्या सुरुवातीला ब्लीचिंगनेही हाेते.
 
याशिवाय आम्ही असा एक पॅक वापरताे जाे त्वचेतील सारा मळ बाहेर ओढून घेताे. वाफेने रंध्रे जास्त पसरतात ज्यामुळे त्वचा बेढब व अधिक मुरमांची हाेऊ शकते.वाफ घेण्याच्या वेळेतील अंतरही किमान 2 महिन्यांचे असावे. तसे सामान्य व ऑयली त्वचावाले याेग्य प्रकारे वाफ घेऊ शकतात.पण जर आपली त्वचा नाजुक असेल तर वाफ अजिबात घेऊ नये. फेशियलनंतर याऐवजी आपण काेल्ड कंप्रेशन ट्रीटमेंट घेऊ शकता.जर आपण वाफ घेत असाल तर कधीही चेहऱ्यावर सरळ वाफ घेऊ नये. एखाद्या उत्त्म क्रीमने मसाज करूनच वाफ घ्यावी.चेहऱ्यावर वाफ अनेक प्रकारे घेतली जाते.
 
यासाठी हवी तर बाजारात मिळणारी वाफ घेण्याची यंत्रेही घेऊ शकता. विद्युतचलित ही यंत्रे काही मिनिटांतच वाफ घेण्यास तयार हाेतात. यंत्र नसल्यास एखाद्या रुंद ताेंडाच्या भांड्यात पाणी उकळा. पाणी उकळू लागताच ते सावकाश उतरवून एका उंच ठिकाणी ठेवा.एक माेठा टाॅवेल डाे्नयावर टाकून भांड्यावर असे झुका की भांड्यासह चेहरा चहुबाजुंनी झाकला नाही. या प्रकारे वाफ घेताना पूर्णपणे सावध राहा. पाच मिनिटांपेक्षा जास्तवेळ वाफ घेऊ नका. जर वाफ चेहऱ्याच्या त्वचेला सहन हाेत नसेल तर आणखी एक विधी आहे ज्यात वाफ सरळ चेहऱ्याव पडत नाही. यासाठी प्रथम पाणी उकळा. आता त्यात एक जाड स्वच्छ कापड भिजवून पिळून घ्या.क्रीमयुक्त चेहऱ्यावर हे कापड ठेवा. असे 4-5 वेळा केल्यास त्वचेला चांगल्या प्रकारे वाफ मिळून जाईल.