पावसाळ्यापूर्वी विविध प्राधिकरणांनी त्यांच्या जागेतील हाेर्डिंगचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेचे आयु्नत भूषण गगराणी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने लागू केलेल्या हाेर्डिंग धाेरणानुसार सर्व हाेर्डिंग नियम पाळून लावल्याची खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी दिले. हाेर्डिंग ज्या खांबांवर उभे करण्यात आले आहे त्या खांबांचीही तपासणी करण्याचे निर्देश आयु्नतांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेसह सर्व संबंधित यंत्रणांना दिले.येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने आयु्नतांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक महापालिका मुख्यालयात झाली. यावेळी प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्राे आणि माेनाे रेल्वे, हवामान विभाग, तटरक्षक दल, नाैदल, एनडीआरएफ, मुंबई पाेलीस, म्हाडा, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, बेस्ट आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित हाेते.
यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने हाेण्यासाठी महापालिकेच्या संबंधित खात्यांबराेबर आणि विभागांसाेबत सर्व यंत्रणांनी समन्वय साधण्याचे निर्देशही आयु्नतांनी दिले.मध्य व पश्चिम रेल्वेच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या कामांबाबत समन्वय साधत प्रवाशांची गैरसाेय हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. मेट्राे प्रशासनाने पाणीउपसा करणारे पंप बसवताना प्रत्येक मेट्राे स्थानकाची भाैगाेलिक रचना लक्षात घेऊन तशा क्षमतेचे पंप बसवावेत, असे आयु्नतांनी सांगितले. सर्व धाेकादायक इमारतींचे सर्वेक्षण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून अशा इमारतींबाबत तेथील रहिवाशांचे स्थलांतर आवश्यक आहे अशा प्रकरणी याेग्य कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली.