साैरऊर्जेमुळे 200 किलाे एलपीजी गॅसची बचत

    14-Mar-2026
Total Views |
 

gas 
 
देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. दुसरीकडे शिर्डीसारख्या माेठ्या देवस्थानात राेज हजाराे भाविक प्रसादाचा लाभ घेतात. साईबाबा संस्थानने अन्न शिजवण्यासाठी साैरऊर्जा यंत्रणा बसवली आहे. या साैरऊर्जा यंत्रणेमुळे राेज सुमारे 200 किलाे एलपीजी गॅसची बचत हाेत आहे.संस्थानमार्फत माेठे प्रसादालय चालवले जाते. तेथे राेज साधारण 40 ते 50 हजार भाविकांसाठी भाेजन तयार केले जाते.त्यासाठी राेज सुमारे 2 टन एलपीजी गॅसचा वापर हाेताे. याशिवाय साईभ्नतांना राेज सुमारे 7 ते 8 हजार नाष्टा पाकिटे दिली जातात; तसेच साईभ्नतांना माेफत दिलजाणारी बुंदी पाकिटे आणि प्रसाद म्हणून विक्रीसाठी तयार करण्यात येणारे लाडू माेठ्या प्रमाणावर बनवले जातात. या सर्व प्रक्रियेसाठी एलपीजी गॅसचाच वापर केला जाताे. साई संस्थान राेज वापरत असलेल्या गॅसपैकी जवळपास निम्मा गॅस केवळ लाडू आणि बुंदी तयार करण्यासाठी खर्च हाेताे.
 
त्यामुळे गॅस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास सर्वप्रथम या लाडू प्रसादाच्या निर्मितीवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.प्रसादालयात अन्न शिजवण्यासाठी 2009 मध्ये साैरऊर्जा यंत्रणा बसवली गेली. या यंत्रणेमुळे राेज सुमारे 200 किलाे एलपीजी गॅसची बचत हाेते. या व्यवस्थेद्वारे राेज जवळपास 5 टन भात आणि डाळ शिजवली जाते. काही दिवसांपासून या यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू हाेते. मात्र, इंधनटंचाईची शक्यता लक्षात घेता हे काम थांबवून पुन्हा साैरऊर्जा यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला आहे.संस्थानने गॅस साठवण्यासाठी 10 टन क्षमतेचे 2 स्टाेअरेज उभारले आहेत.या टँकमध्ये एकूण 20 हजार किलाे गॅस साठवता येताे. हा साठा साधारणपणे 15 दिवस पुरताे. युद्ध सुरू झाल्याच्या काळात साई संस्थानकडे सुमारे 12 टन गॅससाठा शिल्लक हाेता. संभाव्य टंचाई लक्षात घेता संस्थानने तातडीने 15 टन क्षमतेचा एक गॅस टँकर मागवला. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला गॅससाठा पुढील 15 दिवस पुरेल, असे संस्थानने स्पष्ट केले.