दुर्मीळ शेकरूचे दापाेलीत दर्शन

    14-Mar-2026
Total Views |
 
 

shekaru 
 
दापाेली तालुक्यातील जंगल परिसरात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या दुर्मीळ शेकरूचे दर्शन झाल्याने प्राणीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दापाेलीतील डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठ परिसरातील वन विभाग कार्यालयाजवळील उंच झाडांवर मु्नतपणे फिरणाऱ्या शेकरूचा व्हिडिओ नुकताच समाेर आला असून, ताे सध्या माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. दाट जंगलात राहणारा आणि झाडांवर चपळाईने उड्या मारणारा शेकरू हा आपल्या आकर्षक रंगसंगतीमुळे आणि माेठ्या आकारामुळे ओळखला जाताे. लाल, तपकिरी आणि काळसर रंगांच्या छटांमध्ये दिसणारा हा प्राणी साधारणतः 2 ते 3 फूट लांबीचा असताे. त्याची माेठी, झुपकेदार शेपटी ही त्याची खास ओळख मानली जाते. दापाेलीतील विद्यापीठ परिसरातील उंच झाडांवर फिरताना हा शेकरू स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडला. काही नागरिकांनी माेबाइलमध्ये व्हिडिओ टिपला आणि ताे साेशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ समाेर आल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये माेठी उत्सुकता निर्माण झाली असून, प्राणीप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी याबाबत आनंद व्य्नत केला आहे.