सीनियर्सच्या कार्यप्रणालीकडे लक्ष द्या

    14-Mar-2026
Total Views |
 
 
seniors
प्रत्येकाने आपल्या सीनियर्सना गुरू मानून त्याचा आदर करीत त्याच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण एक अनुभवी आणि दूरदर्शी सीनियर कंपनी व कार्यालयाचे सारे चढ-उतार पाहून हाेत असताे. त्याला कंपनीच्या ायद्या-ताेट्याचे पूर्ण ज्ञान असते. केव्हा आणि कशाप्रकारे आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला हवा हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत असते.कंपनी वा कार्यालयातील जास्तीत जास्त लाेकांशी त्याचा परिचय असताे.प्रत्येक विभागात त्याचे येणे-जाणे असते. यामुळे सीनियर्सनी ठरवले तर ते आपली चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. सीनियरला माेठ्याहून माेठ्या अधिकाऱ्यांसमाेर जाण्यात वा त्यांना एखादी गाेष्ट वा प्राॅब्लेम सांगण्यात संकाेच वाटत नसताे. यासाठी आपण ठरवले तर हळू हळू आपल्या सीनियर्सकडून, उच्च अधिकाऱ्यांकडून बाेलण्याची पद्धत शिकू शकता.
 
परंतु आपल्या काेणत्याही सीनियरला गुरू बनवण्यापूर्वी वा त्याच्या पावलावर पाऊल टाकत जाण्यापूर्वी आपला सीनियर व्यवस्थित माणूस आहे की नाही हे अवश्य पाहून घ्यायला हवे. अर्थातच ताे ईमानदार, जागरूक, मृदुभाषी, कामाबाबत परेक्ट, सभ्य आणि शिस्तबद्ध आहे की नाही हे जाणून घ्यायला हवे. कारण जर सीनियरमध्ये सहकार्याची भावना नसेल तर ताे ज्युनियर्सना काय मदत करील.सीनियरच्या साऱ्या खुबी आणि गुण पारखल्यानंतरच त्यांना आपले गुरू माना व त्यांच्या कार्यप्रणालीनुसार चालण्याचा प्रयत्न करा. अयाेग्य, राजकारणी, लाचखाेर व बेईमान तसेच स्वार्थी सीनियर्सपासून दूर राहा.